Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इंडोनेशियात एकाचवेळी २५ भूकंपाचे धक्के; १६२ जणांचा मृत्यू, लहान मुलांची संख्या अधिक

10

जकार्ताः इंडोनेशियाला सोमवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. त्याम‌ुळे इमारतींच्या झालेल्या पडझडीत तब्बल १६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपाच्या धक्क्यात अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. (powerful earthquake kills indonesia)

अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे केंद्र पश्चिम जावा प्रांतातील सियांजुर प्रदेशात भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर होते. भूकंपामुळे सियांजुर परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. काही इमारती, शाळा, रुग्णालयांचीही पडझड झाली आहे.

भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने वाहने रस्त्यावरच थांबली होती. तर, इमारतींच्या पडझडीमुळं नागरिक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू आहे. जावा प्रदेशाचे गवर्नर रिदवान कामिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या १६२वर पोहोचली आहे. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. भूकंप झाल्यानंतर सरकारी शाळेत शिकत असलेले अनेक विद्यार्थी इस्लामिक शाळेत जात होते. सियांजुरमध्ये सर्वाधिक इस्लामिक शाळा आणि मशीदी आहेत.

वाचाः गोवरसाठी ‘धारावी मॉडेल’; सर्वेक्षणातून लसीकरणावर भर देण्याचा प्रयत्न करणार
अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्टर स्केल इतकी होती. तर, भूकंपाचे केंद्र पश्चिम जावा प्रांतातील सियांजुर क्षेत्रापासून १० किलोमीटर (६.२)वर होते. भूकंप आल्यानंतर जवळपास २५ धक्के बसल्याची नोंद करण्यात आली आहे.

भूकंपानंतर सियांजुर प्रदेशात आपत्कालीन कर्मचारी रुग्णालयाबाहेर, टेरेसवर तसेच पार्किंगमध्ये जखमींवर उपचार करीत आहेत. जखमी मुलांना ऑक्सिजन मास्क, सलाइन देण्यात आले आहेत. सिजेडिल या गावात ढिगाऱ्याखाली २५ जण दबले गेले आहेत. बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू आहे. जीवित आणि वित्तहानीचा पंचनामा सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

वाचाः Mumbai : २० कोटींचे अमली पदार्थ जप्त, इथिओपियातून आलेल्या महिलेला घेतले ताब्यात

जकार्तामध्येही भूकंपाचे धक्के

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. शहरातील उंच इमारतींनाही धक्का बसला त्यातील काही इमारती खाली करण्यात आल्या आहेत. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर इमारतीतील काही जण पायऱ्यांवरुन खाली उतरले त्यामुळं काही जिवितहानी झाली नाही.

वाचाः वीजबिलाचे खोटे संदेश पाठवणारे अटकेत, मुंबई पोलिसांची झारखंडमध्ये कारवाई

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.