Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता माध्यमिक तांत्रिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ११६ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारून १०९ विद्यार्थ्यांना जागेवरच जातवैधता प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे होते. तर सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख, सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे, महाविद्यालयाचे प्राचार्य भारत वाबळे उपस्थित होते. या शिबिरात २८९ विद्यार्थी सहभागी झाले होते.
राहाता तालुक्यातील लोणी येथील पद्मश्री विखे-पाटील महाविद्यालयांत व नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता माध्यमिक तांत्रिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इय्यता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात लोणी येथे ९७ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सवीकारून ९२ विद्यार्थ्यांना व भेंडा येथे ११६ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारून १०९ विद्यार्थ्यांना जागेवरच जातवैधता प्रमाणपत्र देण्यात आले.
पानसरे यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेली घोषणा व ‘मंडणगड पॅटर्न’ ची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा समितीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जावून जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ही जिल्ह्यातील महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येईल.’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कमी कालावधीत निकाली काढलेल्या प्रकरणाबाबत समितीच्या कामकाजाचे कौतूक केले होते. ‘‘सेवा पंधरवड्यात राज्यात सर्वाधिक जातवैधता प्रमाणपत्र वितरीत करण्याचे काम अहमदनगर जिल्ह्याने केले आहे. यापुढे ही समितीने असेच उत्कृष्ट काम करावे. येत्या काळात पासपोर्टच्या धर्तीवर जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे काम करण्यात येईल,’’ अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षांच्या पूर्ती करण्याचे काम राज्यात प्रथम अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.