Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इम्रान खान यांनी भारताकडून मिळालेले सुवर्णपदक ‘विकले’: पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ

9

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीच्या काळात भारताकडून मिळालेले सुवर्णपदक “विकले” असा दावा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khwaja Asif) यांनी केला आहे. ख्वाजा यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. ७० वर्षीय क्रिकेटपटू आणि राजकारणी बनलेले खान आजकाल भेटवस्तू खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून चर्चेत आहेत. त्यांनी पंतप्रधान म्हणून तोशाखाना नावाच्या राज्य डिपॉझिटरीकडून सवलतीच्या दरात मिळालेल्या महागड्या ग्रॅफ मनगटी घड्याळाची देखील चर्चा आहे. ते घड्याळ त्यांनी विकल्याचा दावा करण्यात आला आहे. (khawaja asif makes allegations on imran khan)

सोमवारी एका टीव्हीवरील कार्यक्रमादरम्यान आसिफ म्हणाले की, इम्रान खान यांनी भारताकडून मिळालेले सुवर्णपदक विकले होते, असे एक्स्प्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने मंगळवारी पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन) च्या वरिष्ठ नेत्याच्या हवाल्याने म्हटले आहे. खान यांनी कथितरित्या विकलेल्या सुवर्णपदकाबाबत आसिफ यांनी कोणतीही माहिती दिली नाही, असे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

कोश्यारींना राज्यपालपद सोडावं लागणार?,… मराठा महासंघाच्या नेत्यावर गोळीबार … वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन
खान यांची कृती बेकायदेशीर नसून खान नेहमी ज्या उच्च आदर्शाबाबत बोलत असतात त्याच्या विरुद्ध आहे, असे अहवालात म्हटले आहे.
सहसा, अशा भेटवस्तू एकतर तोशाखान्यात कायमस्वरूपी ठेवल्या जातात किंवा ज्या व्यक्तीने त्या कमी किमतीत मिळवल्या आहेत ते खरेदी करू शकतात. तोशाखाना प्रकरणामध्ये “खोटी विधाने आणि चुकीची घोषणा” केल्याबद्दल पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने खान यांना अपात्र ठरवले होते.

८ सप्टेंबर रोजी, पदच्युत पंतप्रधान खान यांनी लेखी उत्तरात कबूल केले की त्यांनी पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्यकाळात मिळालेल्या किमान चार भेटवस्तू विकल्या होत्या. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार नॅशनल असेंब्लीच्या अधिवेशनाला संबोधित करताना, संरक्षणमंत्र्यांनी खान यांचा खरपूस समाचार घेतला आहे. माजी पंतप्रधान सत्तेसाठी वेडे झाले आहेत, असे ते म्हणाले. खान यांनी गेल्या चार वर्षांत त्यांना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या संस्थांना लक्ष्य करू नये, असेही ते पुढे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि लगेच झाली अंमलबजावणी, पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र
आसिफ म्हणाले की, पीटीआयचे अध्यक्ष त्यांना पाठीशी घालणार्‍या संस्थांनी मदत करूनही ते देऊ शकले नाहीत. त्यांनी असे नमूद केले की खान देशाच्या सशस्त्र दलांची निंदा करत होते, त्यांनी अराजकीय राहण्याची घोषणा केली होती.

७५ वर्षांनंतर आपण अशा टप्प्यावर आलो आहोत की सर्व संस्था आपली घटनात्मक भूमिका बजावत आहेत, असे आपण म्हणू शकतो. या संस्थांनी इम्रान खान यांना ‘बिनशर्त पाठिंबा’ दिला,’ असे ते म्हणाले.

छगन भुजबळ यांचे थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र, केली महत्त्वाची मागणी
“इम्रान खान यांनी या संस्थांवर हल्ला करू नये, उलट त्यांच्या मदतीनंतरही ते कामगिरी करू शकलेले नाही याची स्वत: ला लाज वाटली पाहिजे. या महिन्याच्या सुरुवातीला एका हत्येच्या प्रयत्नातून बचावलेले खान या आठवड्यात आपला लाँग मार्च लवकरात लवकर काढतील अशी अपेक्षा आहे. इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर एप्रिलमध्ये त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.