Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दिवाळी अंक हे मराठी भाषेचं लेणं – विश्वास पाटील

5

नवी दिल्ली, दि. २२  : मराठी साहित्याची परंपरा मोठी असून यामध्ये  दिवाळी अंक मराठी भाषेचं लेणं ठरले आहे.  याचा सुगंध राजधानीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून केले जात असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी काढले. 

            महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात आज दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री. पाटील यांचे स्वागत शालरोपटे आणि दिवाळी विशेषांकाचा संच भेट देऊन  केले.  यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळेग्रंथपाल रामेश्वर बरडे तसेच परिचय केंद्राचे कर्मचारी यांच्यासह कॅनडा राजदूत कार्यालयाच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी तथा लेखिका अर्चना मिरजकर उपस्थित होत्या.

            श्री. पाटील म्हणालेमराठी वाचक चोखंदळ असून तो अस्सलदर्जेदार वाचन साहित्याला मान देतो. या वाचनाला दिवाळी विशेषांकांची जोड हा वाचकांसाठी तसेच लेखकांसाठी विशेष देणे आहे. दिवाळी विशेषांक हा कैवल्याचा आनंद देत असून या माध्यमातून लेखकचित्रकारपत्रकार घडत असतात. दिवाळी विशेषांकांची परंपरा ही दुर्गा पूजानिमित्त बंगालमध्ये सुरू झाली. ती मराठी लेखकांनी दिवाळीनिमित्त शंभर- सव्वाशे वर्षापूर्वी सुरू केली. आज ही परंपरा मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनून अधिक वृद्धिंगत होत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

            परिचय केंद्र दिवाळी अंकांचे विशेष प्रदर्शन राजधानी दिल्लीत आयोजित करीत असल्यामुळे येथील मराठी वाचकांसाठीपत्रकारांसाठीसंसद सदस्यांसाठी ही पर्वणी ठरत असल्याचे श्री. पाटील  म्हणाले.

            विश्वास पाटील हे सिद्धहस्त कादंबरीकार असून ते भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी होते. पानिपतझाडाझडतीसंभाजीमहानायक अशा सरसवाचनप्रिय ऐतिहासिक तसेच सामाजिक भान असणाऱ्या कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांच्या कादंबऱ्या अनेक भाषेत अनुवादित झालेल्या आहेत. झाडाझडती या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आजच्या कार्यक्रमात त्यांनी पानीपत कादंबरी लिहितांना दिल्लीहरियाणा आणि आसपासच्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक खाणाखुणांच्या आठवणींना  उजाळा दिला.

            श्री. पाटील लिखित  शिवाजी महासम्राट कांदबरीचा  पहिला खंड  इंग्रजीमध्ये वेस्टलँड प्रकाशनाने  मंगळवारी प्रकाशित केला.

आजपासून ‘दिवाळी अंक’ प्रदर्शन वाचकांसाठी खुले

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनात विविध विषयांवरील नामांकित प्रकाशकांसह नवोदित प्रकाशकांचे 90 च्या वर दिवाळी अंक मांडण्यात आलेले आहेत. यामध्ये थिंक पॉझिटिव्ह,  महाराष्ट्राची जत्राकिशोरकालनिर्णयदिवाळी आवाजमिळून साऱ्याजणीतारांगणमाहेरमार्मिकमहाराष्ट्र टाइम्सलोकसत्तासामनालोकप्रभामिडिया वॉचलोकमत दीपोत्सवचपराकउत्तम अनुवादगोंदणशब्दगांधारप्रतिबिंबकथाश्रीअनघाकिल्लाअक्षरभेटअलकाऋतुरंग असे एकापेक्षा एक सरस वाचनीय दिवाळी अंक परिचय केंद्रात वाचकांसाठी उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन आजपासून ग्रंथालय सदस्यांसाठी खुले आहे.  हे प्रदर्शन पुढील काही दिवस सुरू राहील.

००००

अंजु निमसरकर/ वि.वृ.क्र. 178 /दि. 22-11-2022

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.