Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Disha Salian: आदित्य ठाकरेंना टार्गेट करणाऱ्या भाजप नेत्यांना राऊतांनी झापलं, म्हणाले…

14

Disha Salian case | बॉलीवूड इंडस्ट्रीत टॅलेंट मॅनेजर असलेल्या दिशा सालियन हिचा मालाडच्या गॅलेक्सी रेजंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या पाच दिवस आधी दिशाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

 

Disha Salian case
दिशा सालियन मृत्यूप्रकरण

हायलाइट्स:

  • आदित्य ठाकरे यांच्यासारख्या तरुण नेत्याला बदनाम का केले?
  • या सगळ्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरे यांची माफी मागितली पाहिजे
मुंबई: दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे भाजप नेते आणि महिला नेत्यांनी आता माफी मागावी, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय यंत्रणा असलेल्या सीबीआयचा अहवाल आला आहे. त्यामध्ये दिशा सालियनचा मृत्यू अपघाती असल्याचे म्हटले आहे. मग भाजपच्या नेत्यांनी तेव्हा तोंडाची थुंकी उडवून आदित्य ठाकरे यांच्यासारख्या तरुण नेत्याला बदनाम का केले? आता या सगळ्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरे यांची माफी मागितली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (CBI concludes Disha Salian’s death was an accident)

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची चौकशी संपली आहे. या चौकशीअंती दिशा सालियनचा मृत्यू हा अपघाती असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला होता. यासाठी सीबीआयने कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र, याप्रकरणातील सर्व बाबींचा तपास केला जात होता. बॉलीवूड इंडस्ट्रीत टॅलेंट मॅनेजर असलेल्या दिशा सालियन हिचा मालाडच्या गॅलेक्सी रेजंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या पाच दिवस आधी दिशाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, आता सीबीआयने दिशाचा मृत्यू अपघाती असल्याचा निर्वाळा दिल्याने राणेंच्या आरोपांमधील हवा गेली आहे.

Disha Salian: सचिन वाझे याच्या मर्सिडीजमधून दिशा सालियनला घरी नेण्यात आले? नितेश राणेंचा नवा बॉम्ब

नितेश राणे काय म्हणाले होते?

दिशा सालियन मृत्यूप्रकरणात राहुल कनालचा (Rahul Kanal) काही संबंध आहे का, याचा तपास झाला पाहिजे. ८ जूनला दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री आणि १३ तारखेला राहुल कनाल कुठे होता? त्यावेळचं राहुल कनालचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं पाहिजे. यामधून काहीतरी लिंक नक्की सापडेल. त्यासाठी तपास झाला पाहिजे, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. राहुल कनाल हा आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ गँगचा भाग होता, असेही नितेश यांनी म्हटले होते.
दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते; नारायण राणे यांचा सवाल

नारायण राणेंकडून गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियनची हत्या ८ जूनला आणि सुशांतची हत्या १३ जूनला हत्या झाली. आमच्या वक्तव्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला. मंत्र्याची गाडी होती असे बोलू नका. तुम्हाला पण मुले आहेत. तुम्ही असे काय करू नका. हे मी माझ्या जबाबात सांगितले मात्र हे वाक्य वगळले जबाबातून वगळण्यात आले आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.