Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१” या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका २३ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
१३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ पेपर क्रमांक – २ (स्वतंत्र पेपर लिपिक-टंकलेखक)” (लिपिक-टंकलेखक, – दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षा झाल्या होत्या. संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर उत्तरतालिका पाहण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
*****
राजू धोत्रे/विसंअ/