Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हेही वाचा -प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मग तिथेच बसून खीर-पुरी खाल्ली, करवा चौथचा उपवासही ठेवला, पण..
शाळेत का जात नाही, आईने रागावलं
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात धानवली गाव आहे. धनवले कुटुंब अनेक दिवसांपासून येथे वास्तव्यास आहे. आदल्या दिवशी आई शाळेत का जात नाहीस म्हणून रागावली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यादिवशी तो शाळेत गेला. मात्र, पहाटेच्या वेळी आईने उठून पाहिले तर तो त्याच्या अंथरुणात नसल्याचे तिला दिसून आले. तिने आजुबाजुला सगळीकडे पाहिले मात्र तो काही सापडला नाही.
हेही वाचा -जावयांकडे गाड्या, पण सासुरवाडीला येईनात, लेकी हिरमुसल्या, कारण तरी काय?
नागरिकांना शाळेत सापडला अल्पवयीन मुलगा
त्यानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या मदतीने आई वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. तेव्हा काही नागरिकांना शाळेच्या एँगलला काही तरी लटकत असल्याचे आढळून आले. जवळ जाऊन पाहिले तर अल्पवयीन मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला अशा अवस्थेत पाहताच आईने हंबरडा फोडला. त्याला तात्काळ खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अधिक तपास भोर पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा -चार महिने सैन्यात नोकरी, नंतर समजलं भरती झालीच नाही, तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली
अल्पवयीन मुलगा हा भोर तालुक्यातील धानवली गावातील एका शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे आई-वडील दोघेही अशिक्षित असून भोरच्या आदिवासी भागातील हे गाव आहे. ते सर्व सामान्य शेतकरी कुटुंब आहे. आई मुलाला दररोज सांगायची अभ्यास कर, शाळेत जा, मात्र मुलाकडून अनेकदा कंटाळा केला जात होता. मात्र, आईच्या रागवण्याचा राग मनात धरून त्याने हे पाऊले उचलले असावे, असे पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.
आपला मुलगा शिकावा, पुढे जावा असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. मात्र मुलांनी असा शेवटच्या टोकाचा निर्णय घेणे आई-वडिलांच्या काळजाला धक्का देण्यासारखेच आहे. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली असून आमच्या जगण्याचा आधार गेला असल्याचं मुलाच्या नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे.