Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अमेरिकेत एक कोटीचं पॅकेज सोडलं, मुन्ना महाडिकांचा लेक मायदेशी, बाबांकडून मोठ्ठं बक्षीस

7

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांच्या सुपुत्राची वर्णी लागली आहे. कारखान्याचे चेअरमन म्हणून विश्वराज धनंजय महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी सुरेश जगताप यांनी बिनविरोध निवड झाली आहे. विश्वराज हे महाडिकांच्या तिसऱ्या पिढीतील नेतृत्व आहे. अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून उच्च शिक्षण घेतलेल्या विश्वराज यांनी एक कोटींचं पॅकेज नाकारुन मायदेशी येण्याचा निर्णय घेतला. आता भीमा कारखान्याच्या निवडणुकीतून त्यांनी राजकारणात पदार्पण केलं आहे.

विश्वराज महाडिक कोण आहेत?

विश्वराज हे भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत. माजी आमदार महादेव महाडिक हे विश्वराज यांचे चुलत आजोबा. विश्वराज महाडिकांच्या रुपाने कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. विश्वराज महाडिक यांचा जन्म १७ मे १९९६ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचं शालेय शिक्षण कोल्हापुरातच झालं. पैलवान आजोबांप्रमाणेच त्यांची उंचीही ६ फुटांपेक्षा अधिक आहे.

विश्वराज महाडिक यांनी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. ही जगभरातील टॉप युनिवर्सिटीपैकी एक मानली जाते. कॉलेजमध्ये असतानाच विश्वराज यांना जवळपास एक कोटींच्या पॅकेजची ऑफर आली होती, मात्र त्यांनी ती नाकारुन कोल्हापुरात परतण्याचा निर्णय घेतला, असा दावा धनंजय महाडिकांनी केलाय.

दोन वर्ष नोकरी करुन त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. वडील म्हणाले होते की तिथेच राहा, मात्र आपल्याला घराची ओढ असल्यामुळे स्वतः निर्णय घेतला, अशी माहिती विश्वराज यांनी दिली. २०१९ मध्ये मी परत आलो, त्यावेळी लोकसभा निवडणुकीत महाडिकांना आलेलं अपयश, कारखान्यात आलेल्या अडचणी पाहिल्या. राजकारणात इंटरेस्ट कमी असला तरी कारखान्याच्या कामात मदत करण्याची इच्छा होती, असं विश्वराज म्हणतात.

विश्वराज यांना पक्षी प्राण्यांची आवड आहे. कारखान्याची धुरा खांद्यावर घेतानाच त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यापुढे ते कारखान्यात इथेनॉल प्रकल्प राबवणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : मुलांच्या लग्नानंतर नवस फेडला, सरनाईक कुटुंबीयांकडून तुळजा भवानी चरणी ७५ तोळं सोनं अर्पण

भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीच्या निकालात भीमा परिवाराने दणदणीत विजय प्राप्त केला. भाजप खासदार धनंजय महाडिक यांचं भीमा परिवार पॅनल पहिल्या फेरीत आघाडीवर होतं. राजन पाटील व प्रशांत परिचारक यांचं भीमा बचाव पॅनल पहिल्या फेरीपासून मागे फेकला गेला होता. दुसऱ्या फेरीत देखील देखील महाडिक गटाने वर्चस्व स्थापित केले. माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा सुफडा साफ झाला आहे. तर भीमावर मुन्ना राज प्रस्थापित झाले.

महाडिक गटाचे म्हणजेच भीमा परिवाराचे सर्वच उमेदवार हे जवळपास सहा हजारच्या फरकाने विजयी झाले. धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक हे १० हजार ६२९ मते घेऊन विजयी झाले, तेव्हाच विश्वराज महाडिक हे भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन असतील असा अंदाज व्यक्त केला जात होता.

हेही वाचा : बुद्धी भ्रष्ट झालीये काय? वादग्रस्त वक्तव्ये करताना लाज वाटत नाही का? कोश्यारी-त्रिवेदींवर उदयनराजे तुटून पडले

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.