Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुवाहाटी दौऱ्याला शिंदे गटातील सहा आमदारांची दांडी; पण फडणवीसांचे दोन खास मोहरे सोबतीला

4

Maharashtra Poltical crisis | एकनाथ शिंदे यांनी मला फोन करुन सांगितले की, रवी आपल्याला गुवाहाटीला देवीच्या दर्शनासाठी जायचे आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्यामुळे मी गुवाहाटीला जात आहे. हे हिंदुत्त्ववादी विचारांचे सरकार आहे. या सगळ्यात आपल्याला कुठेतरी देवाची साथ पाहिजे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आपल्याला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेच पाहिजे, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. मोहित कंबोज यांनीही नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला जाण्याच्या एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे समर्थन केले.

 

Devendra Fadnavis & Eknath Shinde
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • शिंदे गटाच्या या गुवाहाटी दौऱ्याला पाच आमदार आणि एका खासदाराची दांडी
  • शिंदे गटासोबत भाजपचे दोन नेते गुवाहाटीला
मुंबई: राज्यात यशस्वी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटाच्या आमदारांना घेऊन गुवाहाटी दौऱ्यावर गेले आहेत. याठिकाणी एकनाथ शिंदे आणि इतर आमदार कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर सर्व काही सुरळीत पार पडू दे, यासाठी एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीला नवस केल्याची चर्चा आहे. हा नवस फेडण्यासाठीच एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला गेल्याचे सांगितले जाते. एकनाथ शिंदे यांनी या चर्चा फेटाळाल्या असल्या तरी त्यांच्या गटातील इतर आमदारांनी कोणताही आडपडदा न बाळगता आमचे हिंदुत्त्ववादी विचारांचे सरकार आहे, नवस फेडणे आमच्या श्रद्धेचा भाग आहे, त्यामुळे फक्त कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाण्यात काहीही गैर नसल्याचे सांगितले आहे. मात्र, शिंदे गटाच्या या गुवाहाटी दौऱ्याला पाच आमदार आणि एका खासदाराने दांडी मारल्याचे समोर आले आहे. (Eknath Shinde camp Guwahati kamakhya temple visit)

यामध्ये चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, महेंद्र दळवी आणि संजय गायकवाड आणि खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. मतदारसंघातील पूर्वनियोजित कामांमुळे आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचे संबंधित आमदारांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी शिंदे गटासोबत भाजपचे दोन नेते मात्र गुवाहाटीला रवाना झाले आहेत. हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील मानले जातात. यापैकी एक म्हणजे मंत्री रवींद्र चव्हाण आणि दुसरे म्हणजे मोहित कंबोज. शिंदे गटासोबत हे दोन्ही नेते गुवाहाटीला कशाला गेले असावते, यावरुन बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गुवाहाटीला जाण्यापूर्वी शिंदे गटाची ताकद वाढली, वंचित-ठाकरे गटाच्या युतीला शह देण्यासाठी नवी खेळी
यासंदर्भात बोलताना आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी मला फोन करुन सांगितले की, रवी आपल्याला गुवाहाटीला देवीच्या दर्शनासाठी जायचे आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्यामुळे मी गुवाहाटीला जात आहे. हे हिंदुत्त्ववादी विचारांचे सरकार आहे. या सगळ्यात आपल्याला कुठेतरी देवाची साथ पाहिजे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आपल्याला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेच पाहिजे, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. मोहित कंबोज यांनीही नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला जाण्याच्या एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे समर्थन केले. गुवाहाटीत असताना शिंदे-फडणवीस सरकार आकाराला आले. तेव्हा एकनाथ शिंदे यांना राज्याला स्थिर सरकार मिळो, असा नवस बोलला होता. तो नवस फेडण्यासाठीच आम्ही गुवाहाटीला जात आहोत, असे मोहित कंबोज यांनी म्हटले.

Eknath Shinde: कामाख्या मंदिरातील पुजाऱ्याने एकनाथ शिंदेंना काय सांगितलं होतं? शहाजीबापूंचा गौप्यस्फोट

शिंदे गटात उत्साह

आज सकाळी ९.३० वाजता शिंदे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांसह गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले. यानिमित्ताने मुंबई विमानतळावर दाखल होत असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये सध्या चांगलाच उत्साह दिसत होता. गेल्या काही दिवसांमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धार्मिक दौरे हे सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. अलीकडेच त्यांनी नाशिकमध्ये एका ज्योतिषाला हात दाखवून भविष्य जाणून घेतल्याची चर्चा होती.

एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी गुवाहाटीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा स्वत: विमानतळावर जाऊन एकनाथ शिंदे यांचे स्वागत करणार आहेत. शिंदे गटाच्या आमदारांच्या स्वागतासाठी गुवाहाटी विमानतळावर लाल पायघड्या घालण्यात आल्या आहेत. शिंदे गटाच्या आमदारांना हॉटेल आणि कामाख्या मंदिरात जाण्यासाठी विमानतळावर आसाम सरकारकडून खास बसेसची सोय करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.