Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सायन पोलीस ठाणे क्षेत्रातील श्री नरोत्तम निवास को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील हे प्रकरण आहे. या सोसायटीत राहणारे निवृत्त आर्मीचे कॅप्टन हरेश गगलानी (७१) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. इमारतीच्या छतावर कबुतप पाळून ती काही हॉटेलांना पुरवली जातात अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती.
क्लिक करा आणि वाचा- गुजरातमध्ये निवडणूक ड्यूटीवर असलेल्या CRPF जवानांचा आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार, २ जवान शहीद, दोन जखमी
हरेश गगलानी यांच्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली आहे. या तक्रारीनंतर सायन पोलीस ठाण्यात आरोपी आणि सोसायटीच्या इतर सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
असे आले प्रकरण उघडकीस
निवृत्त आर्मी कॅप्टन हरेश गगलानी हे ज्या इमारतीत राहतात, त्याच इमारतीत अभिषेक सावंत नावाची व्यक्ती राहते. सावंत हा कबुतर पाळत असे. सावंतने मार्च २०२२ पासून ते मे २०२२ पर्यंत आपल्या इमारतीच्या छतावर कबुतरांची पिल्लं आणून ती पाळली. त्यांना वाढवल्यानंतर त्याने मुंबईतील काही हॉटेलांना मांसासाठी ती विकली.
क्लिक करा आणि वाचा- ‘तुम्हाला गोळ्या घालीन…’; सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांचा सिद्धेश्वरच्या संचालकांवर गंभीर आरोप
ही तक्रार दाखल करताना निवृत्त आर्मी कॅप्टन गगलानी यांनी काही फोटो पोलिसांना दिले. अभिषेक सावतं कबुतर हॉटेलांना विकण्याच्या कामी आपल्या ड्रायव्हरची मदत घेत असे. सावंत हा आपल्या ड्रायव्हरकरवीच कबुतर मुंबईतील रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये विकत असे.
हरेश गगलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीचा वॉचमन छतावर पाणी देण्यासाठी जात असे. या वॉचमननेच कबुतरांबाबतची माहिती सोसायटीच्या इतर सदस्यांना दिली. मात्र त्याच्या बोलण्याकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही. यानंतर पोलिसांनी सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि काही इतर सदस्यांच्या विरुद्ध देखील तक्रार दाखल केली.
क्लिक करा आणि वाचा- उस्मानाबादेत खळबळ; लॉजवर सुरू होता भलताच प्रकार, पोलिसांच्या छाप्यात ५ महिलांची सुटका
सायन पोलीस ठाण्यात या प्रकरणी भादवी कलम ३४, ४२९ आणि ४४७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.