Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत; लवकरचं विमानसेवे बाबत साकारातक निर्णय येईल’
माझी इच्छा फक्त सोलापूरची विमानसेवा सुरू व्हावी अशी आहे.साखर कारखाना बंद व्हावा अशी आमची बिलकुल इच्छा नाही, पण आमच्यावर कोणी दबाव किंवा, दडपण आणण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. मी ललित गांधी आहे. स्वातंत्र्यासाठी लढणारे महातमा गांधी नाही. आरे म्हटले की ,कारे म्हणून उत्तर देणारा मी गांधी आहे,अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे राज्याध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. धमकी देऊन धर्मराज कडादी यांनी मोठी घोडचूक केली आहे, लवकरच सोलापूर विमानसेवा बाबत सकारात्मक निर्णय येईल अशीही माहिती यावेळी गांधी यांनी दिली.
सोलापूर विकास मंच व सोलापुरातील व्यापाऱ्यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र ऑफ चेंबर्सचे राज्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मार्गदर्शन केले. सोलापूरच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. होटगी रोड विमानतळासाठी गेल्या वीस दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. या उपोषण ठिकाणी येऊन सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज कडादी यांनी सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांना धमकी देत बघून घेण्याची भाषा वापरली तसेच रिव्हॉल्व्हर काढून दाखवले.
यानंतर सोलापुरातील वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे राज्याध्यक्ष ललित गांधी यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठकी नंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत धर्मराज कडादी यांना ओपन चॅलेंज केले आहे. आम्ही काय बांगड्या घालून बसलो नाहीत, असे ते म्हणाले.
चोवीस तास झाले अद्यापही गुन्हा दाखल नाही
सोलापूर विमानसेवेला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी मुख्य अडथळा ठरत आहे. ही चिमणी पाडण्यात यावी यासाठी गेल्या वीस दिवसांपासून सोलापूर विकास मंचने चक्री उपोषण सुरू केले आहे. या उपोषण ठिकाणी येऊन कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज कडादी यांनी केतन शहा यांना धमकावून सांगत बघून घेण्याची भाषा वापरली. तसेच खिशामधून रिव्हॉल्व्हर काढून धमकी देण्याचा प्रयत्न केला.
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. पण याबाबतचा सदर बाजार पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही. ललित गांधी यांनी यावर उत्तर देताना खुलासा केला की, आम्ही तक्रार देणे गरजेचे आहे का, पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा व आम्हाला सुरक्षा प्रदान करावी अशी माहिती दिली