Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
maharashtra karnataka border dispute | कर्नाटक किंवा कोणतंही सरकार असो मला महाराष्ट्रासाठी अटक होणार असेल तर मी बेळगावात जाईन. मी बेळगावात लपुनछपून जाणार नाही. मी कोल्हापूरच्या रस्त्याने हजारो शिवसैनिकांसोबत जाऊन बेळगाव न्यायालयात हजर होईन. मला त्यांना किती दिवस ठेवायचे आहे, ते ठेऊ दे. पण हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.
हायलाइट्स:
- संजय राऊतांना आणखी समन्स
- कर्नाटक सरकारकडून कारवाई करण्याच्या हालचाली
यावेळी संजय राऊत यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, शिवसेना ही सीमाबांधवांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. सीमाबांधवांवर हल्ले झाले किंवा कायद्याचा बडगा दाखवून त्यांना तुरुंगात डांबले गेले, तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटल्यावाचून राहणार नाहीत, असे मी म्हटले होते. यामध्ये प्रक्षोभक काय होते, हे आम्हाला कळत नाही. पण २०१८ मध्ये केलेल्या माझ्या भाषणाची दखल घेऊन बेळगाव न्यायालयाने मला १ डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. मी त्याठिकाणी गेल्यानंतर कोर्टात माझ्यावर तेथील संघटनांकडून हल्ला होऊ शकतो. तसेच मला बेळगावमधील तुरुंगात डांबून ठेवले जाऊ शकते, अशी माहिती मला गेल्या दोन दिवसांमध्ये मिळाली आहे. या सर्व कारस्थानाची माहिती माझ्याकडे आहे. पण मला अटकेची भीती नाही.
कर्नाटक किंवा कोणतंही सरकार असो मला महाराष्ट्रासाठी अटक होणार असेल तर मी बेळगावात जाईन. मी बेळगावात लपुनछपून जाणार नाही. मी कोल्हापूरच्या रस्त्याने हजारो शिवसैनिकांसोबत जाऊन बेळगाव न्यायालयात हजर होईन. मला त्यांना किती दिवस ठेवायचे आहे, ते ठेऊ दे. पण हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. शिंदे-फडणवीस सरकारने समितीने नेमलेल्या चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांच्या समितीने या सगळ्याची दखल घेतली पाहिजे, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई महाराष्ट्रातील गावं कर्नाटकात समाविष्ट करण्याविषयी बोलत आहेत. त्यांनी एका विषयाला तोंड फोडले आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना कायदेशीर बाबतीत अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.