Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Udayanraje Bhosale in Satara press conference | प्रतापगडावरील कार्यक्रमासाठी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुनही मी त्याठिकाणी गेलो नाही, हा दावाही उदयनराजे भोसले यांनी सपशेल फेटाळून लावला. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला नाही. कुणीच फोन केला नाही. खोटं बोलायचं कारण नाही. मला कार्यक्रमाबद्दल कुणी सांगितले नव्हते, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
हायलाइट्स:
- उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात पत्रकार परिषद
- उदयनराजेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
मात्र, उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील आजच्या पत्रकार परिषदेत मी खंबीर असल्याचे सांगितले. तसेच प्रतापगडावरील कार्यक्रमासाठी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुनही मी त्याठिकाणी गेलो नाही, हा दावाही उदयनराजे भोसले यांनी सपशेल फेटाळून लावला. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला नाही. कुणीच फोन केला नाही. खोटं बोलायचं कारण नाही. मला कार्यक्रमाबद्दल कुणी सांगितले नव्हते. मी काल रात्रीच पुण्यावरुन उशिरा आलो. मी दोन दिवसांपूर्वी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. ते आपटून काल माझं काम होतं, ते काम करुन काल रात्री मला घरी यायला उशीर झाला. त्यानंतर आज सकाळी मला पत्रिका मिळाली. पत्रिका मिळाली म्हणून मला समजलं की, कार्यक्रम आहे आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री येत आहेत. नाहीतर मला कुणीच बोललं नाही, असे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. उदयनराजे भोसले यांच्या फडणवीस आणि शिंदे यांच्याविषयीच्या काहीशा तिखट आणि रोखठोक प्रतिक्रिया सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
उदयनराजे यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत. छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाही. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. शेवटी राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यांचा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
शिवाजी महाराजांच्यावेळीच तिथी आणि तारखेचा वाद का?
उदयनराजे भोसले यांनी बुधवारी साताऱ्यात आणखी एक पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारखेच्या मुद्द्यावर भाष्य केले. शिवाजी महाराजांच्या संदर्भात तिथी आणि तारखेचा वाद जाणीवपूर्वक केला जातो. शिवाजी महाराजांची जयंती तीन वेळा केली जाते. परदेशातील मित्र नेमकी खरी तारीख कोणती असं विचारतात. सर्व इतिहासकारांनी एकत्र येऊन १९ फेब्रुवारी तारीख ठरवली होती. मात्र, पुन्हा वाद निर्माण करण्यात आला, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.