Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

श्रद्धाला मारल्यानंतर आफताबचं Bumble वरून सायकॉलिजिस्ट मुलीसोबत डेटिंग, आणखी एक ट्विस्ट

8

Shraddha Aaftab case | आफताबने मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या या तरुणीला जाणीवपूर्वक डेट केले होते का, असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे. आतापर्यंतच्या तपासात श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर आफताबने अत्यंत नियोजनपूर्व गोष्टी पार पाडल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबर महिन्यात मी आफताबच्या घरी गेले होते. त्यावेळी आफताबने मला परफ्युमची बाटली आणि काही भेटवस्तू दिल्या होत्या. त्यावेळी मी काहीवेळ आफताबच्या घरी थांबले होते, असे तरुणीने सांगितले.

 

Shraddha Aaftab case
आफताब पुनावालाची पोलिसांकडून चौकशी

हायलाइट्स:

  • आफताब अत्यंत आत्मविश्वासाने वावरत होता
  • मला तेव्हा काहीच संशयास्पद वाटले नाही
नवी दिल्ली: संपूर्ण देशभरात खळबळ माजवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाच्या तपासात दररोज नवनवीन चक्रावून टाकणारी माहिती समोर येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली पोलिसांकडून आफताबची कसून चौकशी सुरु आहे. त्याची पॉलिग्राफ टेस्टही करण्यात आली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर एका मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या तरुणीला डेट केल्याची माहिती आफताबाने पोलिसांना दिली होती. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी संबंधित तरुणीला चौकशीसाठी समन्स पाठवले होते. आफताबने दिलेल्या माहितीनुसार, तो आणि संबंधित तरुणी जून-जुलै महिन्यात बम्बल या डेटिंग अॅपवर भेटले होते. त्यानंतर ही तरुणी छत्तरपूर येथील फ्लॅटवर आफताबला भेटायला आली होती. त्यावेळी आफताबने श्रद्धाची हत्या करुन काही दिवस उलटले होते. तरीही आफताब या तरुणीला बिनधास्त फ्लॅटवर घेऊन आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

आफताबने मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या या तरुणीला जाणीवपूर्वक डेट केले होते का, असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे. आतापर्यंतच्या तपासात श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर आफताबने अत्यंत नियोजनपूर्व गोष्टी पार पाडल्याचे दिसून आले आहे. भविष्यात आपल्याला अटक होऊ शकते. पोलीस तपासावेळी आपली नार्को टेस्ट किंवा पॉलिग्राफ चाचणी होऊ शकते, याचा अंदाज आफताबला होता का? त्यादृष्टीने काही माहिती जाणून घेण्यासाठी आफताबने मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या या तरुणीला डेट केले होते का, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

पोलिसांनी संबंधित मानसोपचार तज्ज्ञ तरुणीची चौकशी केली. यावेळी तिला आफताब पुनावाला आणि त्यांच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तरुणीने सांगितले की, टेलिव्हिजनवर आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला. आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. आम्ही बम्बल या डेटिंग अॅपवर बोलायला सुरुवात केली आणि त्यानंतर एकमेकांना भेटलो. ऑक्टोबर महिन्यात मी आफताबच्या घरी गेले होते. त्यावेळी आफताबने मला परफ्युमची बाटली आणि काही भेटवस्तू दिल्या होत्या. त्यावेळी मी काहीवेळ आफताबच्या घरी थांबले होते. परंतु, मला काहीही संशयास्पद आढळले नाही, असे या तरुणीने सांगितले. ही तरुणी दोनवेळा आफताबच्या घरी आली होती. त्यानंतर ती आपल्या कामासाठी दिल्लीला निघून गेल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत समोर आले आहे.
Shraddha Aftab: लग्नाचा तगादा लावला म्हणून नव्हे तर ‘या’ कारणासाठी आफताबने श्रद्धाला संपवलं

श्रद्धाला ठार मारल्यानंतर आफताबचं डेटिंग

पोलिसांनी आफताब पुनावाला याला अटक केल्यानंतर त्याचा फोन ताब्यात घेतला होता. त्यामध्ये काही डेटिंग अॅप्स आढळून आली. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने स्मार्टफोनवर ही डेटिंग अॅप्स डाऊनलोड केली होती. आफताब श्रद्धाच्या हत्येचे पुरावे मिटवत असतानाच्या दिवसांमध्येच मानसोपचार तज्ज्ञ असलेली तरुणी डेटसाठी आफताबच्या घरी आल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यावेळी आफताबच्या घरात श्रद्धाच्या शरीराचे काही भाग होते, असा संशय पोलिसांना आहे.
फ्रिज घेताना श्रद्धाचा नंबर, मग त्यातच तिचे तुकडे ठेवले; आफताबच्या डोक्यात नेमकं होतं तरी काय?

मानसोपचार तज्ज्ञ तरुणी आफताबद्दल काय म्हणाली?

आफताबसोबत डेटिंग केलेल्या या मानसोपचार तरुणीने पोलिसांना सांगितले की, आफताब अत्यंत आत्मविश्वासाने वावरत होता. त्याच्या वागण्यात मला तेव्हा काहीच संशयास्पद वाटले नाही. त्याने मला चांगली वागणूक दिली. आफताबने मला शिवीगाळ किंवा मारहाण केली नाही. मी आफताबच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घरी मोठ्याप्रमाणावर सुगंधी अत्तरं, potpourri आणि रुम फ्रेशनर्स असल्याचेही संबंधित तरुणीने सांगितले.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Get India news, latest marathi news headlines from all states of India. Stay updated with us to get latest India news in marathi.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.