Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Chhatrapati Shivaji Maharaj | गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपच्या नेत्यांकडून आणि राज्यपालांकडून झालेल्या शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मुद्दा गाजत आहे. या पार्श्वभूमीवर आता सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. शिवाजी महाराजांची लंडनच्या वास्तुसंग्रहालयात असलेली वाघनखं परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शिवराज्याभिषेक दिनापूर्वी हा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
हायलाइट्स:
- शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ही वाघनखं पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न
- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा
- ही वाघनखं इंग्लंडच्या वास्तुसंग्रहालयात आहेत
शिवकालीन इतिहासात प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या अफजलखान वधाच्या घटनेला मोठे महत्त्वं आहे. या घटनेचा दाखला देत आजही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे गोडवे गायले जातात. त्यामुळे या घटनेशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत शिवप्रेमींमध्ये कुतूहल आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे-फडणवीस सरकारने शिवरायांची वाघनखं पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
२०२४ साली ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखं पुन्हा भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे समजते.
भाजपच्या नेत्यांकडून शिवरायांचा अपमान, महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मुंबईत मोर्चा
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यासारख्या महापुरुषांचा राज्यपाल कोश्यारी आणि भाजपच्या नेत्यांकडून झालेल्या अपमानाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून येत्या १७ तारखेला मुंबई मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या निमित्ताने सीमा भागातील मराठी भाषकांवर होत असलेल्या अन्याय, शेतकरी आणि महागाई आदी मुद्द्यांबाबत भाष्य करण्यात येईल. भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष, विविध संस्था आणि संघटनांनी आतापर्यंत या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. तसेच सत्ताधारी पक्षातील शिवप्रेमी आमदार आणि खासदारांनीही या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.