Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेसंदर्भात आलेले वृत्त ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, ‘भयंकर हवेच्या गुणवत्तेचा आणखी एक दिवस. हे बातमीत स्पष्ट झाले आहे. प्रत्येकाला ते जाणवते आहे, प्रत्येकजण त्याबद्दल बोलतही आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांना याचा फटका बसत आहे. परंतु पूर्णवेळ पर्यावरण मंत्र्यांची अनुपस्थिती, हवामानविषयक कृती, जागरुकतेचा अभाव आणि अनुपस्थित सरकार यामुळे सरकार एक शब्दही काढत नाही.’
क्लिक करा आणि वाचा- बेळगावात महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, पवारांचा कर्नाटकला अल्टिमेटम…; वाचा, टॉप १० न्यूज
गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलत असून हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक खालावत असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरून तिने २५० हा गुणवत्ता निर्देशांक आकडा पार केला.
शहरांमधील वाहनांमधून बाहेर येणार धूर, काजळी, धूळ आणि इतर कारणांमुळे मुंबईतील प्रदूषणात सतत वाढ होत आहे. ० ते ५० इतका गुणवत्ता निर्देशांक असेल तर ती हवा स्वच्छ असल्याचे मानले जाते. तसेच हा निर्देशांक ५१ ते १०० इतका मोजला गेला तर हवेची शुद्धता समाधानकारक असल्याचे म्हणता येते. तर, १०१ ते २०० इतका निर्देशांक असेल तर हवेची शुद्धता मध्यम स्वरुपाची, २०१ ते ३०० इतका निर्देशांक असल्यास हवा प्रदूषित व वाईट असल्याचे स्पष्ट होते.
क्लिक करा आणि वाचा- राधाकृष्ण विखे पाटील- थोरातांमधील संघर्ष पुन्हा पेटला; बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले…
या बरोबरच जर हवेचा ३०१ ते ४०० इतका निर्देशांक असल्यास हवा अधिक प्रदूषित आणि अधिक वाईट असल्याचे म्हटले जाते. जर हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०१ ते ५०० इतका असेल तर हवा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असल्याचे स्पष्ट होते.
क्लिक करा आणि वाचा- सत्तेत असताना शांत बसणाऱ्यांना आता कंठ कसा फुटला?; सीमाप्रश्नावरून भाजपचा ठाकरेंना सवाल