Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पंतप्रधान मोदी म्हणतात हा विजय भ्रष्टाचाराविरोधी आक्रोशाचा, तर राज्यपालांनी केला मात्र भलताच दावा

8

पुणे: गुरुवारी देशातील दोन महत्त्वपूर्ण राज्यांचा निकाल लागला त्यात गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला वाढत असलेलं समर्थन हे घराणेशाही आणि भ्रष्टाचार विरोधातील जनतेच्या आक्रोशाच द्योतक असल्याचं म्हटलं होत. पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाही तर भाजपचा प्रत्येक नेता हा विजय भ्रष्टाचारविरोधी आक्रोशाचा असल्याचे म्हणत आहेत. मात्र दुसरीकडे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशातून अजून भ्रष्टाचार संपला नाही, असा दावा केला आहे. डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) तर्फे आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केलाय खरा पण अजून सगळ्या समस्या संपल्या, अडचणी दूर झाल्यात, भ्रष्टाचार संपला, असं नाहीये. पण प्रयत्न सुरू आहेत, असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. तर आपलं सौभाग्य आहे की आज आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने देश इंग्लंडच्या पुढे गेला आहे. आता जगभरातील लोक असे म्हणत आहेत की लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असंही ते म्हणाले आहेत.

वाचाः कमाल झाली! चक्क शेतकऱ्याने जप्त केली पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची, काय घडलं नेमकं

आज देशात अनेक नवीन एअरपोर्ट होत आहेत, रस्ते होत आहेत त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. पण मी एका विचारधारेसोबत जोडलेलो आहे म्हणून हे बोलत नाहीये तर हे सत्य आहे म्हणून बोलतोय. देश आज वेगाने प्रगती करत आहे. सरकारने मला राज्यपाल केलं म्हणून मी त्यांची वाहवा करतो असं नाही, असंही राज्यपालांनी स्पष्ट केलं.

समाजसेवा ही ईश्वर सेवा आहे. गरजवंताची सेवा करणे हे ईश्वराची सेवा करण्याबरोबर आहे. तुम्ही जे तुमचे दैनंदिन काम करता आहात. ते जर योग्य प्रकारे इमानदारीने केल्यास ते देखील समाजसेवेच्या बरोबर ठरते. प्रामाणिकपणे, योग्य मार्गाने काम करत यश मिळविल्यास त्याचा फायदा समजला आणि पर्यायाने देशाला होईल, असं उद्योजकांना संबोधित करताना राज्यपाल म्हणाले आहेत.

वाचाः ब्रेकअप केल्याचा राग, पुण्यात प्रियकराने प्रेयसीचे विवस्त्र फोटो स्टेटसवर ठेवले!

देशात औद्योगिक विकासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहे. देशात रस्ते, विमानतळ यांची निर्मिती हा देशाच्या जलद विकासाचे प्रतीक आहे. शिक्षणाबरोबरच पुणे शहर हे उद्योजकतेचे हब बनत आहे. देशात उद्योजकतेसाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे, असं देखील राज्यपाल म्हणाले.

वाचाः नवऱ्यावर विषप्रयोग करणारी बायको स्वत:ही केमिकल प्यायली; ब्लड टेस्टचा रिपोर्टही आला, पण…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.