Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Politics | महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे सरकारी अनुदान मिळण्याची वाट पाहत बसले नाहीत. त्यांनी लोकांकडून भीक मागून शिक्षणसंस्था उभारल्या, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. पाटील यांना भीक, लोकवर्गणी आणि देणगी यांतील फरक तरी कळतो का, असा सवाल विरोधकांनी विचारला होता.
हायलाइट्स:
- ज्योतिराव फुले हे त्या काळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते
- टाटांचं उत्पन्न २० हजार होते, तेव्हा ज्योतिराव फुले यांचे उत्पन्न २१ हजारांच्या घरात होते
- चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या भाजप नेत्यांना ही गोष्ट माहिती नाही
चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागताना संजय राऊत यांनी म्हटले की, ज्या पक्षाचे नेते शिवाजी महाराजांचा अपमान करतात, त्यांना आदर्श मानत नाहीत, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतात, त्याच वंशातून चंद्रकांत पाटील आले आहेत. हे म्हणजे अकलेचे कांदे आहेत. ज्योतिराव फुले हे त्या काळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, ही बाब या लोकांना माहिती नाही. टाटांचं उत्पन्न २० हजार होते, तेव्हा ज्योतिराव फुले यांचे उत्पन्न २१ हजारांच्या घरात होते. त्यांनी हा पैसा दानधर्म आणि दलितांसाठी शाळा आणि महाविद्यालये उभारण्यासाठी वापरला. या सगळ्याची इतिहासात नोंद आहे, पण चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या भाजप नेत्यांना ही गोष्ट माहिती नाही. त्यामुळे हे लोक महाराष्ट्राच्या दैवतांना कधी भिकारी तर कधी माफीवीर म्हणतात. हे आमचे राज्यकर्ते आहेत, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागितली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. यावर आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार, हे पाहावे लागेल.
शिंदे गटाच्या आमदारांमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलण्याची हिंमत नाही: संजय राऊत
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी दिसत आहे की, आमचं ते आमचं आणि तुमचा तेही आमच्या बापाचं. परंतु आमचे मुख्यमंत्री काय करतात हा प्रश्न आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतात, त्याच्याशी महाराष्ट्राला काही देणघेणं पडलेलं नाही. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या इकडले प्रमुख आहेत. ते बोम्मई यांना कशाप्रकारे उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुख्यमंत्री या लढ्यात उतरले आहेत की नाहीत? कर्नाटकच्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप तोंड उघडलेले नाही. काल देखील आमचे खासदार हे अमित शहा यांना भेटलेले आहेत. मिंधे सरकारचे खासदार यावरती गप्प बसलेले आहेत. बोम्मई बोलतात की, मी अमित शहांचा ऐकणार नाही. मग अमित शहा कसली मध्यस्थी करणार आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
महाराष्ट्रातल्या मागील सर्व मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका कर्नाटकच्या प्रश्नावर घेतलेली आहे. परंतु, आताचे मुख्यमंत्री यावर काहीही बोलले नाहीत. हे सरकार तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे. त्यांचे निशाणी कुलूप पाहिजे, ढाल तलवार नको. त्यांच्या कुलूपाची चावी दिल्लीला आहे. त्यांची बोलण्याची हिंमत नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिनासाठी पक्ष सोडला असे ते सांगतात, मग आता कुठे आहे त्यांचा स्वाभिमान, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचे अवहेलना पदोपदी करावी महाराष्ट्राचा अपमान करावा, यासाठी संपूर्णपणे षडयंत्र आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.