Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गेल्या काही वर्षांपासून या दोन समस्यांना सामोरे जात असताना, मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. हवेची गुणवत्ता मोजणारी दोन उपकरणे गोवंडी पश्चिमेला बसवण्यात आली आहेत. एक उपकरण हे मानखुर्द परिसरातही आहे. मात्र, प्रदूषणाला सातत्याने तोंड द्यावे लागते त्या गोवंडीत मात्र एकही उपकरण बसविण्यात आलेले नाही. ही उपकरणे संपूर्ण भागातील प्रदूषण नोंदवण्यासाठी लावण्यात यावीत, अशी मागणी ‘गोवंडी न्यू संगम वेलफेअर सोसायटी’ने केली आहे.
देवनार डम्पिंग ग्राऊंड आणि जैव वैद्यकीय कचरा प्लांटचा परिणाम स्थानिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना श्वसनाचे त्रास होत असल्याचे संघटनेचे संस्थापक फय्याज शेख यांनी सांगितले. प्रदूषणात वाईट हवेची भर पडत असल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. मोठ्यांसोबतच लहान मुलांना आणि वृद्धांनाही हा त्रास होत असल्याचे शेख यांनी म्हटले आहे. प्लांटमधून होणारे प्रदूषण मोजण्यासाठी अनेक रहिवाशांनी आपल्या गॅलरी व छतावर एअर क्वालिटी फिल्टर यंत्र बसवली आहेत. यंत्रांमध्ये हवेच्या गुणवत्तेचे आकडे घेण्यात आले. त्यामध्ये हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत नोंदवण्यात आल्याचा दावा संगम वेल्फेअर सोसायटीने केला आहे.
एअर क्वालिटी फिल्टरचा पर्याय
सर्वच रहिवाशांना एअर क्वालिटी फिल्टर विकत घेणे शक्य नसल्याने स्थानिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेने एअर फिल्टर बसवावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. सरकारी पातळीवर हवेची गुणवत्ता तपासणारी उपकरणे असावीत. त्यामुळे स्थानिकांना डेटा उपलब्ध होऊ शकेल.