Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गुजरातच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी हजेरीही लावली होती. आता भाजपला गुजरातेत दणक्यात यश मिळालंय. आता मुंबई महापालिकेसाठी गुजरातीबहुल भागात गुजराती नेते येतील. उत्तर भारतीय प्राबल्य असणाऱ्या भागात तिकडचे नेते हजेरी लावतील. प्रत्येकाला काय काम द्यायचे हे भाजपने ठरवलंय. असं असताना काँग्रेसचं निवडणुकीसाठीचं नियोजन काय आहे?
हायलाइट्स:
- ना कसलं नियोजन ना कसला हिशेब
- मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचं प्लॅनिंग काय?
नुकतीच राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती झाली. मध्यंतरी दिल्लीत त्यांनी स्टिअरिंग कमिटीची बैठकही घेतली. सगळे प्रभारी त्या बैठकीला उपस्थित होते. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे स्टिअरिंग कोणाच्या हाती, हे कोणालाही माहिती नाही. त्यात मल्लिकार्जुन खरगेंनी या बैठकीत तुमचे पद पक्के आहे, असे समजू नका. एक महिन्याच्या आत पुढच्या निवडणुकांची ब्ल्यू प्रिंट मला सादर करा, असे आदेशही दिलेत. मात्र कॉंग्रेस कार्यालयात कोणताही लगबग दिसत नाही. कॉंग्रेसकडे मुंबईत….
- वर्षा गायकवाड, अस्लम शेख, बाबा सिद्दिकी, नसीम खान, सुरेश शेट्टी हे पाच माजी मंत्री
- तर मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत.
- सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे तीन माजी मुख्यमंत्री
- शिवाय बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री आहेत
कागदावर एवढा मोठा संघ आहे. परंतु मैदानात उतरुन मुंबई महापालिकेची जबाबदारी घ्यायला कोणीच नसल्याची परिस्थिती आहे. आणि जर कोणी आलेच तर उरलेले सगळेजण त्या नेत्याचं ऐकतील अशी स्थती नाही. उलट भाजपमध्ये फडणवीसांनी एखादी गोष्ट सांगितली तर ती टाळून पुढे जाण्याची हिंमत कोणाकडे नाही. परंतु कॉंग्रेसमध्ये ना कसलं नियोजन आहे ना कसला हिशेब…. पक्षाचे प्रभारी एच. के पाटील यांनी पालिका निवडणुकीसाठी कोणत्याही बैठका घेतलेल्या नाहीत.
- भाजप आणि मनसेच्या BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा धडाका
- कुठे कोण कमजोर, कुठे कोण शिरजोर? याचा आढावा घेणं सुरु
- उद्धव ठाकरेंविषयी मुस्लीम समाजामध्ये वाढत असलेली सहानुभूती
- अशा स्थितीत काँग्रेसचा उरलासुरला बेसही संपेल अशी शक्यता
- तर दुसरीकडे तीच सहानुभूती कमी करत निवडणुकीचे बिनचूक नियोजन करणे
- या दोन्ही पातळ्यांवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काम सुरु
गुजरातच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी हजेरीही लावली होती. आता भाजपला गुजरातेत दणक्यात यश मिळालंय. आता मुंबई महापालिकेसाठी गुजरातीबहुल भागात गुजराती नेते येतील. उत्तर भारतीय प्राबल्य असणाऱ्या भागात तिकडचे नेते हजेरी लावतील. प्रत्येकाला काय काम द्यायचे हे भाजपने ठरवलंय. असं असताना काँग्रेस, राष्ट्रवादीचं नियोजन काय आहे? या मोठा चर्चेचा विषय आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची गेली २५ वर्षांपासून सत्ता आहे. त्यात ठाकरेंकडे शाखांचे संघटन असल्याने निवडणुकीतही त्यांना त्यांचा चांगला लाभ मिळेल.
राहुल गांधींनी महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा काढली… मात्र मुंबईत यात्रेचा फार काही बोलबोला पाहायला मिळाला नाही. होर्डिंग्जचा खर्च करायचा कोणी? यावरून अख्खी यात्रा संपली तरी मुंबईत दहा-वीसच्या वर बॅनर लागले नाहीत. तर राष्ट्रवादीचा मुंबईत म्हणावा तेवढा बेस नाही. शिवसेना-काँग्रेस आघाडी व्हावी, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. यावर अजूनतरी काँग्रेसने फारसे मनावर घेतलेले दिसत नाही. अशी सगळी परिस्थिती असताना मुंबईत काँग्रेसचे काय होणार? याची चर्चा सध्या पक्षातल्याच पदाधिकाऱ्यांमध्ये रंगते आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.