Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांच्या सेवेत लवकरच Yatri App; रिअल टाईम लोकेशन, तिकीट दर सगळं एका क्लिकवर

7

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रवासी आता लवकरच अधिकृतपणे ट्रेनचं लोकेशन ट्रॅक करू शकणार आहेत. त्याशिवाय कोणत्याही स्टेशनवर त्यांच्या नियमित ट्रेनची वेळ सेट करू शकतील. मध्य रेल्वेवर यात्री ॲपला अतिशय फायदा झाल्यानंतर तसंच मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हे ॲप पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठीही सुरू करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेसाठी जुलैमध्ये यात्री ॲप सुरू करण्यात आलं होतं. हे ॲप अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्हीसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. आता हे ॲप पश्चिम रेल्वेसाठीही सुरू करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या ९३ उपनगरीय रॅकवर जीपीएस डिव्हाइसेस इन्स्टॉल केली जात आहेत. हे डिव्हाइसेस एसी लोकलसाठीही इन्स्टॉल करण्यात येत आहेत. ॲपच्या अल्गोरिदमनुसार हे ॲप पश्चिम रेल्वे मार्गावर ट्रेनचं रियल टाईम लोकेशन सांगण्यास सक्षम असेल.

हेही वाचा – सुसाट रस्ते, नागमोडी वळणं, चहुबाजूने हिरवळ…समृद्धी महामार्गाचे हे ३० फोटो पाहाच

ट्रेनचं लोकेशन कसं तपासाल?

– तुम्ही ज्याठिकाणी आहात ते स्टेशन सिलेक्ट करा.
– प्रवासाची दिशा निवडा. उदा. सीएसएमटी किंवा कल्याणच्या दिशेने
– ट्रेनचं लाईव्ह लोकेशन मिळवण्यासाठी ट्रेनच्या टाइमटेबलवर क्लिक करा.

अलर्ट कसा सेट कराल?

– प्रवासी त्यांच्या स्टेशनवरुन ट्रेन निवडू शकतात.
– ५ ते ३० मिनिटं किंवा तुम्ही निवडलेल्या दिवसाआधी किंवा आठवड्यातील कोणत्याही दिवसांसाठी अलर्ट सेट करता येतो.
– १५ सेकंदानंतर ॲप ऑटो रिफ्रेश होईल. तसंच युजर्स लेटेस्ट डेटासाठी रेफ्रेशवर क्लिक करू शकतात.

हेही वाचा – बर्फवृष्टी होत असताना रात्रीच्या अंधारात चीनने डाव साधला, अरुणाचल प्रदेश सीमेवर नेमक काय घडलं; वाचा ग्राउंड Report

काय मिळणार फीचर्स?

यात्री ॲपमध्ये युजर्सला अपडेटेड टाइमटेबल, तिकीटाचे दर, लांब पल्ल्याच्या गाड्यांची माहिती, आपत्कालीन नंबर्स, जर्नी प्लॅनर अशा अनेक सुविधा या ॲपमध्ये मिळतील.

सर्वात आधी Yatri App मध्य रेल्वेसाठी सुरू करण्यात आलं होतं. काही महिन्यात मध्य रेल्वेवरील जवळपास ६ लाख युजर्सनी या ॲपचा वापर केला आहे. यात्री ॲपसाठी अशाच प्रकारचा प्रतिसाद पश्चिम रेल्वेवर मिळेल अशी अपेक्षा आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत Yatri App पश्चिम रेल्वेसाठी लाँच केलं जाईल अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक, निरज वर्मा यांनी दिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.