Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

९ लाख ७९ हजार केंद्रीय पदे रिक्त; आयएएस, आयपीएस तसेच सीबीआय पदांचाही समावेश

5

वृत्तसंस्था, नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ९ लाख ७९ हजार पदे रिक्त असल्याची आकडेवारी बुधवारी लोकसभेत सादर करण्यात आली. आयएएस, आयपीएस तसेच सीबीआयमध्येही मंजूर पदे भरलेली नसल्याचे याद्वारे समोर आले आहे.

व्यय विभागाने बुधवारी वार्षिक अहवाल लोकसभेच्या पटलावर ठेवला. १ मार्च, २०२१पर्यंतची केंद्र सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदांची आकडेवारी यामध्ये नमूद करण्यात आली आहे. यानुसार केंद्र सरकारच्या सर्व विभागांत मिळून ९ लाख ७९ हजार ३२७ पदे रिक्त असल्याची माहिती कार्मिक विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. आयएएस अधिकाऱ्यांसाठीच्या १४७२ पदांवरही अद्याप नियुक्ती झालेली नाही. सन २०२२पर्यंत आयएएससाठी राज्यनिहाय मंजूर पदे ६७८९ असून, ५३१७ पदांवर आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. दुसरीकडे याशिवाय आयपीएस अधिकाऱ्यांच्या मंजूर ४९८४ पदांपैकी ८६४ रिक्त आहेत. तर भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकाऱ्यांच्या मंजूर ३१९१ पदांपैकी १०५७ पदे रिक्त आहेत. ही संख्या १ जानेवारी, २०२२पर्यंतची आहे. ३० नोव्हेंबर, २०२२पर्यंत सीबीआयच्या एकूण ७२९५ पदांपैकी १६७३ पदे होती. यापैकी १२८ पदे अतिरिक्त निर्माण करण्यात आली होती. ‘सर्व केंद्रीय विभागांना व मंत्रालयांना कालबद्ध पद्धतीने रिक्त पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत’, अशी माहिती सिंह यांनी दिली.

९१ अधिकारी नियुक्तीविना

सन २०२१मध्ये लोकसेवा आयोगातर्फे निवड झालेल्या ९१ उमेदवारांना सरकारी विभागांमध्ये अद्याप नियुक्ती दिली नसल्याचीही माहिती समोर आली आहे. या वर्षात एकूण ७४८ उमेदवारांना आयएएस, आयपीएस व आयएफएस पदांसाठी निवडण्यात आले. मात्र ७ डिसेंबर, २०२२पर्यंत यापैकी ९१ उमेदवारांना कोणत्याही सरकारी विभागात नियुक्तीच मिळालेली नाही. मर्यादित प्राधान्य, वैद्यकीय चाचणीतील निष्कर्ष, राखीव जागांबाबतचा अयशस्वी दावा, उमेदवारांची माघारी अशी यामागील ठळक कारणे आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.