Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेलं आप्पांचं गाव शामगांव. आप्पा फक्त अवघी तिसरी शाळा शिकलेले, पण त्यांच्या किर्तनातून त्यांनी कमावलेली भाषा ऐकताना आप्पा एवढी कमी शाळा शिकलेत असं वाटायचं नाही. ७० वर्षांपूर्वी बोलली जाणारी मराठी कशी होती? हे आप्पांच्या कीर्तनातून कळायचं. आप्पांची भाषा आणि कथनशैलीवर प्रचंड अभ्यास होता. तरुणपणी किर्तनासाठी सायकलीवरून फिरले आणि मैलौ-मैल गेले आणि हे यश संपादन केलं
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून ते अगदी सामान्य माणसांनी त्यांची कीर्तन ऐकली आहेत. राज्य मार्ग ७६ मसूरवरून रायगावला जाताना शामगाव फाटा येतो तेच आप्पांचं गाव. शतकापूर्वीच्या नोंदी वाचताना याच भागात कधीकाळी पुसेसवळीच्या शाहिरांचे पोवाडे आणि चोराडेंच्या कलाकारांचा कलगी तुरा रंगला. त्यानंतर काही वर्षांनी आप्पाची कीर्तने लोकप्रिय झाली होती. आर्थिक परिस्थितीने थोडे गरीब पण समृद्ध सांस्कृतिक परंपरा निर्माण करणारे म्हणजे ‘आप्पा’.
नामदेव आप्पांना आपल्या उभ्या आयुष्यात खूप पुरस्कार मिळाले. कीर्तन केसरी, वारकरी रत्न, वारकरी भूषण, असे खूप सारे पुरस्कार आप्पांना मिळाले. तसेच खान्देशात देखील त्यांचे चांगलेच वर्चस्व होते. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यातील श्रीराम. वाघाडी बू ता. शिंदखेडा हे संपुर्ण गाव त्यांचे जास्त आवडीचे होते. पूर्ण गावाचे ते गुरु व पूर्ण गाव त्यांचे शिष्य होते. वारकरी परंपरा व संत वान्ड्मय काय आहे हे त्यांनी सर्वांना सोपे करुन सांगितले. मात्र, दोन दिवसांपूर्वी आप्पा हे जग सोडून गेले. अंत्यसंस्करावेळी त्यांच्या गावासह त्यांच्या आवडीचे म्हणजेच वाघाडी हे गाव देखील धाय मोकलून रडत होतं.
डुक्कर विष्णूचा अवतार, त्याचा दात पाण्यात ठेवून मुलींना पाजा, कालीचरण महाराजांचा अजब सल्ला