Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नागपूरमध्ये एकनाथ शिंदेंविरोधात मविआचा हल्लाबोल, राज्यात ग्रामपंचायत निकालाची रणधुमाळी; वाचा, टॉप १० न्यूज
MT Online Top Marathi News : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, राज्यातील ७१३५ ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. ठिकठिकाणी दिग्गजांना धक्का देणारे निकाल लागले. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचा मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज, २० डिसेंबर २०२२
१. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंवर पहिल्यांदाच भूखंड घोटाळ्याचे आरोप, मुंबई हायकोर्टाच्या आदेशाचा दाखला देत विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नाना पटोले तर विधानपरिषदेत ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर शिंदेंचा आरोप फेटाळत पलटवार
२.आमच्या कामांना स्थगिती का? अजित पवारांसह मविआने विधानसभा तापवली, देवेंद्र फडणवीसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न
३.राष्ट्रीय महामार्गावर मोठी दुर्घटना; भरधाव स्कूल बसचा अपघात, अनेक विद्यार्थी गंभीर जखमी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रवास
४. नागपूरमधील विधान भवन इमारतीत हिरकणी कक्ष, आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन
५. बुलढाण्यात बाईकवर बाळाला दूध पाजणं जीवावर, खाली पडून महिलेचा मृत्यू, चिमुकली मातृप्रेमाला मुकली
६. मशीनगन घेऊन पाक सैनिकांना यमसदनी पाठवणाऱ्या भैरोसिंह राठोड यांचे निधन; लोंगेवाला पोस्ट येथे गाजवले होते शौर्य
ग्रामपंचायत निवडणूक निकाल स्पेशल
७. बाळासाहेब थोरातांना मूळ गावातच मोठा धक्का, विखे पाटलांच्या गटातील महिला सरपंचपदी विराजमान, मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व
८. शिंदे गटाचे खासदार धैर्यशील मानेंच्या भावाला पराभवाचा धक्का; कोल्हापुरात अनेक ठिकाणी उलथापालथ
९. इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई गावगाडा हाकणार, निळवंडे सरपंचपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय!
१०. विनायकराव मेटे यांच्या मृत्यूनंतरही कार्यकर्त्यांनी गड राखला, तब्बल ३२ ग्रामपंचायतीवर शिवसंग्रामचा झेंडा
मटा अॅप डाउनलोड करा
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.