Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Omicron BF.7: करोनाची नवी लाट; बूस्टर डोसनंतर लशीचा चौथा डोसही घ्यावा लागणार?; तज्ज्ञांनी दिलं स्पष्ट उत्तर

15

नवी दिल्लीः चीनमध्ये करोनाच्या नव्या लाटेने धुमाकुळ घातला आहे. ओमायक्रॉनच्या बीएफ ७ या विषाणू प्रकाराचे भारतात तीन रुग्ण आढळून आले. ओमायक्रॉनच्या या विषाणू प्रकाराची संसर्ग करण्याची क्षमता अधिक असल्याचे समोर आलं आहे. चीनसह अमेरिका, ब्राझील, जपानसह अनेक देशात या विषाणूप्रकाराचे रुग्ण आढळले आहेत. भारतातही रुग्ण आढळल्याने चिंता अधिक वाढली असून आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आहे. करोनाचा धोका वाढत असताना पुन्हा एकदा करोना प्रतिबंध लस घ्यायची का हा मुद्दा चर्चेत आला आहे.

करोना उद्रेकाची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडाविया यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेत देशातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. देशातील फक्त २७ टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. याविषयी बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी टास्क फोर्सच्या सदस्यांनी नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, असं अवाहन केलं आहे.

नागरिकांनी करोना लसीचा चौथा डोस घ्यावा का असा प्रश्न उपस्थित होत असताना एम्सचे माजी डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यावर महत्त्वाचे भाष्य केलं आहे. नागरिकांनी लवकरात लवकर लशीचा बुस्टर डोस घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारकडूनही बुस्टर डोसवर भर देण्यात येत आहे. लशीचा चौथ्या डोसबाबतही गुलेरिया यांनी माहिती दिली आहे. लशीच्या चौथ्य डोसबाबत अद्याप कोणताही डेटा समोर आलेला नाहीये. चौथा डोस घेण्याची इतक्यात गरज नाहीये. जोपर्यंत बायवेलेंट लस येत नाही तोपर्यंत चौथा डोस घेण्याची आवश्यकता भासणार नाही, असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

वाचाः Corona virus : BF.7 किती धोकादायक? भारतात अलर्ट; राज्यांनी सुरू केली तयारी, लागू शकतात निर्बंध

बायव्हॅलेंट लस म्हणजे मूळ व्हायरसच्या स्ट्रेन कंपोनेंट आणि ऑमिक्रॉन व्हेरिंयटच्या एका कंपोनेंट मिळून तयार केली जाते. या व्हॅक्सीनमुळं संसर्गापासून अधिक सुरक्षा मिळते. दोन कंपोनंटमुळं या लसीला बायव्हॅलेंट असं म्हणतात. बायव्हॅलेंट लस कोविड-१९ बूस्टर डोसचं अपग्रेड व्हर्जन असल्याचंही बोलतात.

वाचाः नव्या व्हेरियंटमुळं टेन्शन, राज्य सरकारने उचलली गंभीर पावलं, कृतिगट स्थापन करणार
चिंता नको, काळजी घ्या

‘चीनमध्ये करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतातील नागरिकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही; मात्र, या आजाराचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी पूर्वीप्रमाणेच खबरदारी घेणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केले.

वाचाः मुंबई ते पणजी प्रवास करा आता शिवशाहीने; उद्यापासून सेवा सुरू, भाडे फक्त…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.