Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Christmas Story ख्रिसमस २०२२ : नाताळ सण, येशुच्या जन्माची कथा

4

ख्रिसमस अर्थात नाताळ सणासाठी बाजारपेठ सजली असून, सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांच्या खरेदीला उधाण आल्याचे पहावयास मिळत आहे. शनिवारी ख्रिसमस साजरा होत असून, शहरातील चर्चमध्ये तयारीला वेग आला आहे.

२५ डिसेंबरला जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मित्र- मंडळींना केक भरवून आनंद साजरा करतात. खरंतर, येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस साजरा केला जातो. बायबल या धार्मिक ग्रंथानुसार येशू हा देवाचा मुलगा आहे.

इतिहासातील काही प्रकरणांचा अभ्यास केल्यास सात ते दोन इ. मध्ये येशूचा जन्म झाला होता. येशूच्या जन्मतिथीवरून अनेक मतमतांतरे आहेत. पण, रोमन साम्राज्याच्या दरम्यान कॉन्सटेंटाइनच्या काळात या तिथीला मान्यता मिळाली आणि तेव्हापासूनच २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. येशूचा जन्मदिवस जनतेपर्यंत पोहवणारी व्यक्ती होती सेक्स्तुस ज्यूलिअस अफ्रिकानुस. सेक्स्तुसनं २२२ इ.मध्ये ख्रिस्ती इतिहासात या तिथीचा उल्लेख केला. याआधी ख्रिसमस साजरा करण्यासाठी कोणतीही तारीख वा दिवस निश्चित नव्हता.

येशुच्या जन्माची कथा

ख्रिसमसला ख्रिस्ती धर्मात फार महत्त्वाचे स्थान आहे. येशुच्या जन्माची एक कथा फार प्रचलित आहे. ईश्वराने ग्रॅबिअल या त्याच्या दूताला मरियमकडे पाठवले. ग्रॅबिअलनं मरियमला तुझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा जगाचा तारणहार जन्माला येणार आहे. तुझ्या मुलाचं येशू असेल. तो जगाचा उद्धार करेल तसंच तो सर्वोत्तम राजा बनेल. असा दृष्टांत ग्रॅबिअलनं मरियमला दिला. ज्यावेळेला मरियमला येशूच्या जन्माचा संकेत मिळाला तेव्हा ती अविवाहित होती. काही दिवसांनी मरियमचं जोसेफ नावाच्या तरूणासोबत लग्न झालं. लग्नानंतर मरियम नाजरथ येथं स्थायिक झाली. (नाजरथ हे इस्राइलमधील एक शहर होतं.) त्याकाळी नाजरथमध्ये रोमन साम्राज्य होतं. मरियमनं मध्यरात्री एका गोठ्यात येशूला जन्म दिल्याची मान्यता आहे.

येशूच्या जन्मस्थळापासून काही अतंरावर काही मेंढपाळ त्याच्या मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले होते. असं म्हटलं जातं की ईश्वर स्वतः देवदूताचं रूप धारण करून तिथं पोहचले व त्यांनी मेंढपाळांना या शहरात ‘एका देवदूताचा जन्म झाला आहे. तो स्वतः ईश्वर आहे.’ असा संदेश दिला. त्या देवदूताच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून मेंढपाळ त्या नवजात बाळाला पाहण्यासाठी पोहचले. बघता बघता येशूची किर्ती सगळीकडे पोहचली आणि येशू ख्रिस्तला पाहण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली होती. ‘येशू परमेश्वराचा मुलगा आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी तो पृथ्वीवर आला आहे.’ अशी लोकांची मान्यता होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.