Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अधिकाऱ्यांनी सांगितलं, की मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेने (एसएसबी) विश्वासू सूचनेच्या आधारे मंगळवारी छापेमारी केली. लॅमिंटन रोड परिसरातील एका इमारतीमध्ये ग्राहक असल्याचा खोटा वेश धारण करुन इथे छापा मारण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीदरम्यान तीन महिलांसह चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, जे कथितरित्या हे रॅकेट चालवण्यात सामिल होते. या रॅकेटमध्ये असणारे दहा जणांनी घटनास्थळावरुन पळ काढला आहे.
हेही वाचा – चार्ल्स शोभराजची जेलमधून होतेय सुटका; भारतासह ९ देशांना डोकेदुखी ठरला होता बिकिनी किलर
‘जबरदस्तीने देहविक्री व्यापाऱ्यात ढकललं होतं’
पोलिसांनी या परिसराचा तपास केला. त्यावेळी पोलिसांना तिथे एक विशेष रुपात बनवलेलं तळघर आढळलं. या तळघरात २६ महिलांना ठेवण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या राज्यात राहणाऱ्या महिलांनी पोलिसांना सांगितलं, की त्यांना जबरदस्तीने देहविक्री व्यापाऱ्यात ढकलण्यात आलं होतं.
हेही वाचा – पतीला संपवून शेजारीच झोपली पत्नी; मुलांना म्हणाली, बाबांना उठवू नका हं! पुढे काय घडलं?
एसएसबीने ताब्यात घेतलेल्या लोकांना आणि या रॅकेटमधून वाचवण्यात आलेल्या महिलांना पुढील तपासासाठी डीबी मार्ग पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलं आहे. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईतील दहिसर भागात एका हॉटेलवर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी १७ महिलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं होतं.
हेही वाचा – होय मीच श्रद्धाला मारलं… आफताबने मान्य केला गुन्हा; पॉलिग्राफ टेस्टमध्ये संतापजनक गौप्यस्फोट
ठाण्यातील कोपरी भागातूनही देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी १६ ते १७ वर्षीय मुलींची सुरक्षित सुटका केली होती.