Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईकरांचा श्वास पुन्हा कोंडला, मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात, पुढील दोन दिवसांत परिस्थिती अधिक बिघडणार

15

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबईची हवा गुरुवारी ‘वाईट’ होती. माझगाव, चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी येथील हवेची गुणवत्ता दिवसभर ‘अतिवाईट’ नोंदली गेली. हवेची घसरलेली गुणवत्ता आता पुन्हा किती काळ मुंबईकरांना अनुभवावी लागणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक गुरुवारी संध्याकाळी २८०च्या पुढे होता. माझगाव येथे ३१६, चेंबूर येथे ३२३, वांद्रे-कुर्ला संकुल येथे ३३७ तर अंधेरी येथे ३१५ असा पीएम २.५ चा निर्देशांक गुरुवारी नोंदला गेला. कुलाबा येथे पीएम २.५ चा निर्देशांक २७६ तर मालाड येथे २९५ होता. वरळी, भांडुप, बोरिवली येथे हवेची गुणवत्ता मध्यम होती. या सगळ्याच केंद्रांवर ‘पीएम २.५’ या प्रदूषकाचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली. या काळामध्ये अतिरिक्त थकवा जाणवण्याची शक्यताही वाढू शकते. फुप्फुसांचे आजार असणाऱ्यांना किंवा हृदयरोग असणाऱ्यांना हा त्रास अधिक जाणवू शकतो.

थंडीची तीव्रता वाढणार

‘सफर’ या हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या प्रणालीच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस हवा वाईट ते अती वाईट या श्रेणीत असेल. २५ डिसेंबरच्या आसपास मुंबईच्या तापमानाचा पारा आणखी उतरण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये थंडीची तीव्रता काही काळ वाढणार असल्याने त्याचा परिणाम प्रदूषणावरही होण्याची शक्यता आहे. या काळात किमान तापमानाचा पारा १३ ते १४ अंशांपर्यंत खाली येऊ शकतो. कमाल तापमानातही घट होऊ शकते. त्यामुळे पुन्हा एकदा धुरक्याची जाणीवही मुंबईकरांना होऊ शकते. गुरुवारी दिवसभर उन्हाचा ताप जाणवूनही हवेमध्ये प्रदूषके हवेमध्ये साचून राहिल्याचे आढळून आले. सांताक्रूझ येथे गुरुवारी कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३०.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान २५ डिसेंबरच्या आसपास २८ अंशांपर्यंत खाली उतरू शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.