Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भूपेश भुवन पटेल असे अपहरण झालेल्या बाळाचं नाव आहे. विजय अनंतर जयस्वाल आणि सुमन शर्मा अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत. त्यांनी १० डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवरून मुलाचे अपहरण केले होते. पोलिसांनी या दोघांना रांजणगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
जयंत पाटलांचं निलंबन, शरद पवार यांचा थेट अजित पवार यांना फोन, म्हणाले….
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात उदनिर्वाहासाठी आलेलं एक दाम्पत्य त्यांच्या मूळगावी झारखंड येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. या दाम्पत्याबरोबर त्यांचा अडीच वर्षाचा मुलगाही बरोबर होता. प्लॅटफॉर्मवर सरकत्या जिन्यालगत रात्री साडे-आठ वाजण्याच्या सुमारास अपहरणकर्ते त्यांच्याजवळ आले. त्यांच्याशी गप्पा मारू लागले. महिलेने तिच्याजवळील खाऊ मुलाला खाण्यास दिला.
या दरम्यान मुलाबद्दल आपल्याला जिव्हाळा आहे, असे दाखवून ते दोघे त्या बाळाला आणखी खाऊ आणतो म्हणून घेऊन गेले. मात्र, परत न आल्याने मुलाच्या आई-वडिलांनी याबाबत रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. लोहमार्गचे पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अक्षिक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिअधिक्षक चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोज खोपीकर, स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्गाचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
मुलाच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्गाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलींद झोडगे यांच्या नेतृत्वात सात तपास पथके तयार करण्यात आली होती. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील चौकांचे व संपूर्ण परिसराचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी या पथकांनी केली. त्याचप्रमाणे शहरातील ७८ लॉज, हॉटेल्सवर छापे मारण्यात आले. तसेच ११० विक्रेत्यांकडील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. तपासात पोलिसांना माहिती मिळाली की, बालकाचे एका महिलेने तिच्या साथीदारासह अपहरण केले आहे. त्यासाठी त्यांनी रिक्षाचा वापर केला आहे. या माहितीनुसार अपहरणकर्तेच्या तांत्रिक हालचाली व सोशल मीडियावरील हालचालींचा वेध घेऊन मुलाचा शोध घेण्यात आला.