Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, खरे सांगतो मोदींवर ‘त्यांचे’ नियंत्रण आहे

17

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लाल किल्ल्याजवळ भाषण करताना नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधींनी चीनसोबतच्या संघर्षापासून ते आर्थिक मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या सरकारच्या काळात देशात द्वेषाचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. हिंदू-मुस्लिम यांच्यात २४ तास द्वेष पसरवला जात आहे, मात्र, देशाचे वास्तव यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. सरकार लक्ष विचलित करण्यासाठी हे मुद्दे आणत असल्याचे ते म्हणाले. यात मोदीही काही करू शकणार नाहीत. ते ही परिस्थिती हाताळू शकत नाहीत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे, अशी घणाघाती टीका गांधी यांनी केली आहे.

देशातील छोट्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांना अडचणीत टाकले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्या भारत जोडो यात्रेचे लक्ष्य भारताला जोडणे हेच आहे, असे ही ते म्हणाले.

अहमदनगरमध्ये देवस्थानांच्या ठिकाणी मास्कसक्ती होणार, करोना प्रोटोकॉल लागू करणार : विखे पाटील
राहुल गांधी पुढे म्हणाले, कन्याकुमारीमध्ये जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला, तेव्हा मी विचार करत होतो की द्वेष नष्ट करणे आवश्यक आहे. या देशात सर्वत्र द्वेष पसरला आहे हे माझ्या मनात होते. मी चालायला सुरुवात केली तेव्हा मला या रस्त्यांवर लाखो लोक भेटले. पण आजकाल हिंदू-मुस्लीम फाटाफूट मीडियात सतत २४ तास चालवली जात आहे. पण हे वास्तव नाही. देशातील सर्वसामान्य नागरिक हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन एकमेकांचा आदर करतात हे सत्य असताना असे का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तुमचे लक्ष विचलित करून तुमचा खिसा कापला जातो

राहुल गांधी म्हणाले, जेव्हा कोणी तुमचा खिसा कापतो तेव्हा तो काय करतो… सर्वप्रथम तुमचे लक्ष विचलित करतो. जे काही केले जात आहे ते सर्व तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच केले जात आहे. ही गोष्ट ते २४ तास करतात आणि मग तुमचा खिसा कापला जातो. शेतकऱ्यांचा, मजुरांचा जो काही पैसा आहे तो थेट त्यांच्या मालकाच्या खिशात जातो. हे नरेंद्र मोदींचे सरकार नसून अंबानी आणि अदानींचे सरकार आहे.

कर नाही त्याला डर कशाला, चौकशीला सामोरे जायला का घाबरता?; रामदास कदमांचा ठाकरेंवर निशाणा
छोट्या व्यापाऱ्यांना धक्के दिले जात आहेत

मी आतापर्यंत २,८०० किमी चाललो आहे. मला कुठेही द्वेष दिसला नाही, मला कुठेही हिंसा दिसली नाही. पण जेव्हा मी टीव्ही चालू करतो तेव्हा मला सगळीकडे हिंसा आणि द्वेष दिसतो. कारण त्यांना तुमचे लक्ष दुसरीकडे वळवायचे असते. हे या देशात घडत आहे. तुमचे लक्ष कुठे जायला हवे?, सर्वप्रथम तुमचे लक्ष भारतातील तरुणांकडे वळले पाहिजे. आज भारतातील तरुण काय करतात, ते पकोडे बनवतात. बेरोजगारी का आली? छोटे व्यापारी जे छोटे व्यवसाय चालवतात त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. हे लोक देशाला रोजगार देतात. ते २४ तास गुंतलेले असतात. बँकेचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद असतात. भारतातील दोन-तीन मोठ्या उद्योगपतींना १ लाख कोटी, ३ लाख कोटी दिले जातात. बँकेसमोरून छोट्या व्यावसायिकांना हाकलून लावले जाते. त्यानंतर पंतप्रधानांनी नोटाबंदी आणि चुकीचा जीएसटी लागू केला. हे धोरण नसून ते छोटे व्यापारी आणि शेतकरी यांना मारण्याचे हत्यार आहे. या कामातून देशातील तरुणांना रोजगार मिळू शकत नाही. रोजगार देणाऱ्यांचा कणा तुम्ही मोडला आहे.

राहुलला थंडी का जाणवत नाही हे सांगितले

राहुल गांधी म्हणाले की, मीडियाचे लोक मला विचारतात की तुम्हाला थंडी का वाजत नाही? राहुल म्हणाले, ‘मला वाटले ते मला तर विचारत आहेत, पण ते भारतातील शेतकरी, मजूर आणि गरीब मुलांना का विचारत नाहीत. मग ते म्हणतात की बघा, ते २८०० किलोमीटर चालले आहेत. ही काही मोठी गोष्ट नाही. संपूर्ण देश चालतो, शेतकरी, मजूर, कारखान्यात काम करणारे मजूर चालतात. आपण २८०० किमी चालतो, शेतकरी आपल्या आयुष्यात १०-२० हजार किमी चालतो.

खासदार राहुल शेवाळे अडचणीत येणार?; उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे ‘त्या’ प्रकरणी SIT मार्फत चौकशीचे निर्देश
राहुल पुढे म्हणाले की, लक्ष हे योग्य ठिकाणी जायला हवे आहे. भाजपने धर्माचा मुद्दा उपस्थित केला आहे. हिंदू धर्माबद्दल बोलूया, गरीब आणि दुर्बल लोकांना चिरडले पाहिजे असे हिंदू धर्मात कुठे लिहिले आहे. दुर्बलांना मारावे असे कुठे लिहिले आहे? मी गीता, उपनिषदे वाचली आहेत. मात्र असे कुठेही वाचलेली नाहीत. ते आता देशात भीतीचे वातावरण पसरवत आहेत. शेतकऱ्यांची व्यथा पाहिली. भाजपच्या राजवटीत आम्हाला भीती वाटते, असे लोकांनी मला सांगितले. भगवान शिवाच्या चित्रात पसरलेल्या हाताला अभय मुद्रा म्हणतात, याचा अर्थ घाबरू नका, हिंदू धर्म म्हणतो घाबरू नका, हे लोक २४ तास या देशात भीती पसरवण्याचा प्रयत्न करतात.

पंतप्रधान मोदींवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे

राहुल म्हणाले की, यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोष नाही, ते ही परिस्थिती सांभाळू शकत नाही आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. मी खरं सांगतोय विमानतळही त्यांचा, बंदरही त्यांचा, लाल किल्लाही त्यांचा. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व कंपन्या त्यांच्या आहेत, रेल्वे त्यांच्या आहेत. ताजमहालही निघून जाईल. हे देशाचे वास्तव आहे. महामार्गही त्यांचे आहेत, सेलफोनही त्यांचे आहेत. पण सत्य आमचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.