Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पोपट उर्फ कैलास सर्जेराव तावरे, निलेश हरिभाऊ केदारी, अक्षय यशवंत तावरे, सुरज प्रल्हाद तावरे, समीर कैलास जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. गुन्हा नोंद करण्यात आलेले हे सर्व कार्यकर्ते बारामती तालुक्यातील मोरगावचे रहिवासी आहेत. याबाबत पोलीस हवालदार तुषार शिवाजी जैनक यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
क्लिक करा आणि वाचा- चंद्रपुरात राजकीय तमाशा; मंत्री मुनगंटीवारांना येण्यास उशीर ; खासदार संतापले आणि थेट…
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मंगळवार दिनाक २० डिसेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान बारामती तालुक्यातील मोरगाव हद्दीत विजयी मिरवणूक काढण्यात आली. पोपट उर्फ कैलास सर्जेराव तावरे, निलेश हरिभाऊ केदारी, अक्षय यशवंत तावरे, सुरज प्रल्हाद तावरे, समीर कैलास जाधव यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयी उमेदवाराची ही विजयी मिरवणूक काढली. विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांनी ही विजयी मिरवणूक काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नव्हती.
क्लिक करा आणि वाचा- संजय राऊत यांचे ‘ते’ खंदे समर्थक थेट शिंदे गटाच्या सचिवपदी, उद्धव ठाकरेंनी केली होती हकालपट्टी
विनापरवाना काढण्यात आलेल्या या विजयी रॅलीदरम्यान या सर्वांनी जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण केली. तसेच या मिरवणुकीत विनापरवाना डीजेचा देखील वापर करण्यात आला. इतक्यावरच न थांबता मयुरेश्वर मंदिरासमोर विनापरवाना भाषण करून सभ्यता व नीतीमत्ता यांस धोका पोहचेल असे चिथावणीखोर भाषण केले, असाही त्यांच्यावर आरोप आहे. तसेच पोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग केला अशा आशयाच्या फिर्यादीवरून या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, भाजप खासदाराची मोदींवर टीका; वाचा, टॉप १० न्यूज