Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
माझी हयात आंबेडकर चळवळीत गेली हे सांगत असताना आता मत परिवर्तन झाले का? या विषयावर उत्तर देताना अंधारे भडकल्या. याबाबत आपण १५० वेळा मुलाखती देऊन खुलासे केल्याचे त्या म्हणाल्या. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहे. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. यावर अंधारे यांना प्रश्न केला गेला. AU म्हणजे अनन्या उदास असे वारंवार रिया चक्रवतीने सांगूनही चुकीच्या पद्धतीने टीका होत असल्याचे उत्तर अंधारे यांनी यावेळी दिले.
दिशा सालियन प्रकरणी एसआयटी नेमून आणि टीका करून यांना अधिवेशनाचा काळा वाया घालवायचा आहे. मूळात यांना अधिवेशनात चर्चाच घडवून आणायची नाहीए. ८३ कोटीचा भूखंड दोन कोटीला कसा विकला? यावर त्यांना चर्चाच करायची नव्हती. १५ लोकांना क्लीन चिट देता, त्यावर चर्चा करत नाही. जी माणसं बोलणारी आहे, त्यांना निलंबित केलं जातं. जयंत पाटील यांना निलंबित करता. जयंत पाटील यांनी अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि राजकारणाची कारकिर्द आहे. यामुळे लोक बघत आहे हे सर्व. लोक विसरत नाही, असे म्हणत सुषमा अंधारेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
पंढरपूर देवस्थान कॉरिडोरला विरोध; भाजप खासदार स्वामी यांची भूमिका
माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे खरे वारकरी नाहीत. ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, कीर्तनकार, प्रहसनकार आहेत. पेड कीर्तनकार आहेत, माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा आरोपमाझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा आरोपअशी टीका अंधारे यांनी वारकरी संप्रदायाच्या आंदोलनावर केली. माझ्या वक्तव्या सारखे सावरकरांनी, श्री रविशंकर यांनीही लिहिले आहे. त्यांना किंवा त्यांच्या विचाराची भूमिका घेणाऱ्या लोकांना संप्रदायिक प्रश्न का विचारत नाही? असा सवाल सुषमा अंधारे यावेळी केला.
शिंदे गटाच्या शहर उपप्रमुखाला सामूहिक अत्याचार प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न? कोर्टाचे