Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राष्ट्रवादीला झटका!, महेश कोठे हे शिंदे गटाचे आगामी आमदार; मंगेश चिवटेंचा गौप्यस्फोट

6

सोलापूर : मंगेश चिवटे यांनी रविवारी एका कार्यक्रमात एक मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जवळचे असलेले व मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महेश कोठेंना बाळासाहेबांच्या शिवसेनेतील आगामी आमदार महेश कोठे असा उल्लेख आपल्या भाषणात केला. यामुळे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. महेश कोठेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी भक्कम होईल, असे मानले जात होते. पण मंगेश चिवटे यांच्या वक्तव्याने सोलापूरच्या राजकारणात वेगळे चित्र निर्माण झाले आहे.

महेश कोठे सोलापूरच्या राजकारणातील केंद्रबिंदू

काँग्रेसमध्ये अनेक वर्षे राजकारण व समाजकारण केलेले महेश कोठे हे नेहमी सोलापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहेत. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठेंनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आमदारकीचं तिकीट महेश कोठेंना न देता दिलीप माने यांना दिलं होतं. त्यावेळी महेश कोठेंनी शिवसेनेत राहून शिवसेना उमेदवार दिलीप माने यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. दिलीप माने यांच्या पेक्षा अधिक मतं मिळवून दाखवली होती. शिवसेनेत घुसमट होत असल्यासारखे चित्र निर्माण झाल्याने अखेर महेश कोठे यांनी महाविकास आघाडीची सरकार असताना हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवार यांनी देखील महेश कोठेंवर विश्वास दर्शवत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी देखील दिली होती. महाविकास आघाडीची राज्यात सरकार असताना शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी महेश कोठेंच्या घरी शरद पवार आवर्जून गेले होते. आणि भोजनही केले होते. राष्ट्रवादीत महेश कोठेसारखा मजबूत नेता आल्यावर सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा महापौर होईल, अशा वलग्ना अनेकदा केल्या गेल्या होत्या.

मंगेश चिवटेंच्या वक्तव्याने राजकीय भूकंप

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून राष्ट्रवादीला एक प्रकारची मरगळ आली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकांना अनेक दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली. महेश कोठे देखील क्वचितच राष्ट्रवादीच्या बैठकांना दिसून येत आहेत. राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन शिंदे गटात प्रवेश केला. महेश कोठेही शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. रविवारी संध्याकाळी लिंगायत समाजाच्या एका कार्यक्रमात मंगेश चिवटे आले होते. मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. या कार्यक्रमात महेश कोठे, सुधीर खरटमलसह आदी नेते उपस्थित होते.

माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा

माजी महापौर महेश अण्णा कोठे, बाळासाहेबांच्या शिवसेनेतील भावी आमदार आहेत. महेश अण्णा हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महेश कोठेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे, असे वक्तव्य मंगेश चिवटे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. महेश कोठेंच्या जाण्याची चर्चा सुरू असताना मंगेश चिवटे यांनी आपल्या भाषणातून गौप्यस्फोट केला आहे.

शिंदे फडणवीसांचं सरकार अनैतिक, भाजपच्या माजी खासदाराचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींवरही टीका

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.