Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बावनकुळेंना करेक्ट कार्यक्रमाचा इशारा,दिल्लीला फोन लावून विस्तार करा, अजित पवारांनी खडसावलं

41

नागपूर : राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मराठवाडा आणि विदर्भाच्या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांना टोले लगावले. अजित पवार यांनी विरोधी पक्षांनी मराठवाडा आणि विदर्भासंदर्भात मांडलेल्या ठरावावर भाष्य केलं. राज्यातील पुरवण्या मागण्यांवरुन अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर प्रश्न उपस्थित केले. गेल्या १० वर्षांच्या इतिहासात इतक्या पुरवण्या मागण्या नव्हत्या तितक्या सभागृहात मांडल्या, अर्थमंत्री म्हणून तुम्ही आर्थिक शिस्त मोडली असल्याचं अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं.

सत्ता येत असते सत्ता जात असते, कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना स्थगिती सारख्या गोष्टी घडत नव्हत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली. विदर्भाकडे जवळपास २० वर्ष मुख्यमंत्रिपद होतं. ते फक्त पश्चिम महाराष्ट्राचं बघतात असा आरोप आमच्यावर केला जातो. पण विदर्भात २० वर्ष मुख्यमंत्रिपद होतं, मराठवाड्यातही मुख्यमंत्रिपद होतं. जे माझ्या हातात होतं ते देण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, आम्हाला बदनाम करण्यात आलं, असं अजित पवार म्हणाले.

राज्यात एसआयटी एसआयटीचा खेळ सुरु

अनिल देशमुख असतील, छगन भुजबळ असतील किंवा कुणीही असो कुठलाही गुन्हा सिद्ध न होता त्याला वर्ष दोन वर्ष तुरुंगात टाकणं योग्य नाही. या प्रकरणात सगळं घरदार विचलित होतं, असं अजित पवार म्हणाले. तुम्ही सत्तेत आल्यानंतर उठसूट एसआयटी, एसआयटी लावली जातेय. राज्याला ईडी, सीबीआय माहिती होती आता मात्र एसआयटी एसआयटी सुरु आहे. पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, देवेंद्र फडणवीस यांनी त्याकडे लक्ष द्यावं, असं अजित पवार म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांना इशारा

महाराष्ट्रात सर्वात ताकदवान नेता देवेंद्र फडणवीस आहेत. तुम्ही काही लोकांना संधी दिली आहे तो तुमचा अधिकार आहे. मविआच्या सरकारनं विदर्भ मराठवाड्यावर अन्याय केल्याचा आरोप केला जातो. पण, समतोल विकास करण्याचा प्रयत्न आम्ही मविआ आणि त्यापूर्वी देखील केला होता. आपलं सरकार आल्यानंतर एक नेते बारामतीत आले आणि बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा वल्गना करतात. आमचं तिथं काम आहे खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? मला चॅलेंज देतात मी ठरवलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन, असं अजित पवार म्हणाले. राजकीय नेत्यांनी किंवा जनतेनं रात्री १२ ते ३ दरम्यान प्रवास टाळावा, असं अजित पवार म्हणाले.

मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने CBIची विनंती फेटाळली

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली साडेचार वर्ष मुख्यमंत्री राहणार होते, त्यानंतर वेगळ्या विदर्भाचा ठराव करणार होते. उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही पण गिरीश महाजन यांना आतंरराष्ट्रीय स्तरावर भाजप वाढवायला पाठवायचं आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

विदर्भात धान, संत्री, कापसावर प्रक्रिया करणारी कारखानदारी आली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रावर आरोप करण्यापेक्षा विदर्भातील नेत्यांनी आपल्या मनगटातील ताकद दाखवावी, असं अजित पवार म्हणाले. विदर्भातील जिल्हा बँका कुणी बंद पाडल्या असा सवाल अजित पवार यांनी केला. सहकार मंत्री अतुल सावे अजून रुळले नाहीत, त्यांना काय विचारलं की ते देवेंद्र फडणवीस यांना विचारतो असं म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ खाती आहेत, तुमच्या खात्याचा भार त्यांच्याकडे कशासाठी? सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री ते आहेत. नवे सहा पालकमंत्री नेमले तर काम होणार नाही का?

महाराष्ट्र केसरी होणार पुण्यात, मात्र नगरमध्ये रंगली राजकीय कुस्ती

भाजपला सहा महिन्यात एक महिला सापडत नाही. हा कसला कारभार आहे, मी अमृतावहिनींना सांगणार आहे, त्यांनी सांगितलं की काम होईल. तुम्हाला अजून २२ जणांना संधी देता येईल, दिल्लीला फोन लावा आणि मंत्रिमंडळ विस्तार करुन टाका, असं अजित पवार म्हणाले.

विकासकामांच्या मुद्यावरुन टोलवाटोलवी सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं की एकनाथ शिंदे यांच्याकडे जावा असं सांगतात. एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की करु असं म्हणतात. नुसती टोलवाटोलवी सुरु आहे. यामुळं चंद्रकांत पाटील यांची आठवण येते, कोल्हापूरच्या ढाण्यावाघाकडे एक दोन खाती देऊन बाजूला ठेवलं आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

रोहित पवार-राम शिंदे संघर्षात तीन अधिकारी निलंबित, दोन दिवसात विखेंची तिघांवर कारवाई

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.