Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Solapur Local News: महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांपैकी असणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. सुशील कुमार शिंदे जवळपास सहा महिन्यांनी सोलापूर येथील काँग्रेस भवनात आले होते. यावेळी ते खूपच थकलेले दिसत होते.
हायलाइट्स:
- सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणुकीच्या राजकारणातून एक्झिट
- सोलापुरातून काँग्रेस पक्षाचा नवा चेहरा कोण?
- काँग्रेसला कधी सत्ता येते, याची काळजी नाही
सुशीलकुमार शिंदे माध्यमांना थकलेल्या आवाजात माहिती माहिती देताना सांगितले की,मी लोकसभा निवडणुक लढवणार नाही. पण काँग्रेस पक्षात राहून सक्रिय राहणार असे सांगितले .शिंदेच्या वक्तव्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेसकडून कोणता नवा चेहरा येईल याची उत्सुकता लागली आहे. भारतीय जनता पार्टी खासदारकीला नव्या चेहऱ्याच्या शोधात असताना शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर भाष्य
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतच राहणार आहेत, मी मुख्यमंत्री असताना सीमावाद सुप्रीम कोर्टात पाठवला होता, महाराष्ट्राने स्पष्ट भूमिका घ्यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना आणखीन कार्यकाळ पूर्ण करायचा आहे अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस संपणार नाही;सुशीलकुमार शिंदेंचा दावा
काँग्रेस पक्षाच्या वाटचालीवर बोलताना शिंदे म्हणाले , काँग्रेसला कधी सत्ता येते, याची काळजी नाही. काँग्रेसच्या वाटचालीमध्ये तीन-चार वेळा सत्तांतर झाली आहे, तरीपण काँग्रेस आजतागायत टिकली. सोनिया गांधी यांच्यासारख्या नेत्या ज्या परदेशी असूनही काँग्रेस नेटाने चालवली आहे. काँग्रेस कधी संपणार नाही, असा दावाही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार यांनी केला.
थकलेल्या आवाजात शिंदेंनी भावना व्यक्त केल्या
२०१४ व २०१९ असे दोन वेळा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदेना भाजपकडून पराभव पत्करावा लागला.सुशीलकुमार शिंदे यांनी वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केली आहेत.काँग्रेस भवन येथे गुरुवारी सकाळी आले असता,सुशीलकुमार शिंदे वयाने व मनाने खचले आहेत की काय असे दिसून आले. माध्यमांशी बोलताना त्यांनी थकलेल्या आवाजात,जड अंत:करणाने स्पष्ट सांगितले,मी लोकसभा निवडणुक लढवणार नाही. शिंदेंच्या आवाजातून व त्याच्या दाढी न केलेल्या चेहऱ्यावरून एक थकेलला राजकारणी असे दिसून आले.
सुशीलकुमार शिंदेची दुसऱ्यादा घोषणा
केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सोलापुरात शिंदे शाही गेल्या तीस वर्षांपासून आहे. २०१४च्या मोदी लाटेत शिंदे शाहीच्या किल्ल्याला सुरुंग लागले. २०१४ मध्ये शरद बनसोडे यांनी लाख भर मताने सुशीलकुमार शिंदेंना पराभूत केले.पराभव झाल्यानंतर शिंदेंनी २०१४मध्येच घोषित केले होते,२०१९ ची लोकसभा निवडणुक लढवणार नाही. २०१९ मध्ये काँग्रेसला मजबूत उमेदवार न मिळाल्याने पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदेना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. २०१९ मध्ये राजकिय गणित थोडं वेगळी होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर ,भाजपचे डॉ जय सिद्धेश्वर महास्वामी शिवाचार्य यांसोबत लढत झाली. बहुजन मतांचा विभाजन झाल्याचा फायदा भाजपला झाला. त्यामुळे २०१९च्या निवडणुकीत पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदेचा पराभव झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.
सहा महिन्यानंतर काँग्रेस भवनला शिंदेंचे चरणस्पर्श
सोलापुरातील १९८४ पासून काँग्रेस वाढवण्यासाठी सुशीलकुमार शिंदे मोठी भूमिका बजावली होती.शिंदेचे निकटवर्तीय विष्णुपंत कोठे यांनी देखील सुशीलकुमार शिंदे खंबीर साथ दिली होती. काँग्रेस भवन उभारण्यात सुद्धा शिंदे आघाडीवर होते.पण अलीकडच्या काळात या काँग्रेस भवनात सुशीलकुमार शिंदे क्वचितच येतात. काँग्रेस स्थापन दिनाला सुशीलकुमार शिंदे काँग्रेस भवनला आल्याने कार्यकर्त्यांत वेगळाच उत्साह दिसून आला. तब्बल सहा महिन्यानंतर काँग्रेसभवनला शिंदेच चरणस्पर्श झाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.