Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
क्लिक करा आणि वाचा- राहुल गांधी २०२४ ला पंतप्रधानपदाचा चेहरा असतील; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा मोठा दावा
दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त गौरव सिंग यांनी वाहतुकीतील बदलाबाबतचे आदेश जारी केले आहेत. ‘वाहतूक सुरळीत व्हावी आणि नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान पादचाऱ्यांची सुरक्षा व्यवस्थित पद्धतीने व्हावी यासाठी, ३१ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १ जानेवारी पहाटे ८ वाजेपर्यंत काही वाहतूक नियमांची अंमलबजावणी केली जाईल, असे सिंग यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुंबईतील ऐतिहासिक माउंट मेरी चर्चला बॉम्बने उडण्याची धमकी; लष्कर-ए-तोयबाने पाठवला ईमेल
हे रस्ते वाहतुकीसाठी बंद
> एनसीपीए ते प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. (टीप: प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरकडून एनएस रोडकडे येणारी उत्तरेकडील वाहतूक खुली ठेवली जाईल)
> मादाम कामा रोड (उत्तर हद्द) मंत्रालय जंक्शन ते एअर इंडिया जंक्शनच्या दिशेने बंद राहील.
> फ्री प्रेस जर्नल मार्ग (उत्तर हद्द) स्थानिक रहिवासी वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.
> छत्रपती शिवाजी महाराज मार्ग (दक्षिण हद्द) सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- ती महिला विधानभवनाच्या आवारात फिरते, याचा अर्थ तिच्यामागे कोणती तरी शक्ती आहे: जितेंद्र आव्हाड
येथे पार्किंग बंद
आज ३१ डिसेंबरच्या रात्री ८ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ च्या पहाटे ६ वाजेपर्यंत खालील रस्त्यांवर (दक्षिण आणि उत्तर हद्द) पार्किंग करता येणार नाही.
> एन.एस. रस्ता
> मॅडम कामा रोड
> वीर नरिमन रोड
> पीजे रामचंदानी मार्ग
> महाकवी भूषण मार्ग
> अॅडम स्ट्रीट
> बेस्ट मार्ग
> हाजी नियाज अहमद आझमी मार्ग
> हेन्री रोड
> छत्रपती शिवाजी महाराज मार्ग
> शहीद भगतसिंग रोड (कुलाबा कॉजवे) रीगल सर्कल ते हाजी नियाज अहमद आझमी मार्ग (आर्थर बंदर रोड) च्या जंक्शनपर्यंत
> महर्षी कर्वे मार्ग