Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! डॉक्टर पतीचे डॉक्टर पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबध, घरातूनही हाकलले
अहमदनगरच्या नामांतराची मागणी जुनीच आहे. विशेष म्हणजे अनेक पक्ष आणि संघटनांकडून यासाठी वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. अंबिकानगर हे सर्वात आधी सूचविलेले नाव आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही एका सभेत ही घोषणा केली होती. आता मनसेचाही त्या नावाला पाठिंबा आहे. त्यानंतर आनंदनगर हे नावही जैन समाजाकडून पुढे करण्यात आले. गेल्यावर्षी आमदार पडळकर यांनी अहिल्यादेवीनगर हे नाव लावून धरले. अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी हे गाव अहमदनगर जिल्ह्यात असल्याने त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
क्लिक करा आणि वाचा- मानवी शरीरात सापडला नवा ‘अवयव’, शास्त्रज्ञांनी डॉक्टरांना दिला सावधगिरी बाळगण्याचा इशारा
यावर सरकारने हालचाली सुरू केल्या असल्या तरी असा बाहेरच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून होणारा निर्णय स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनाही मान्य नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो स्थानिकांना विश्वासात घेऊनच व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही हीच भूमिका मांडली आहे. नामांतराला आमचा विरोध नाही, मात्र जो काही निर्णय घ्यायचा तो स्थानिकांनी घ्यावा, अशी भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यसोबतच जिल्हा विभाजनाचा जुना मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील निवडणुकीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या विखे पाटील यांचा याला विरोध होता. मुख्य म्हणजे आता भाजपमध्ये जाऊन खासदार झाल्यानंतरही त्यांचा विरोध कायम आहे. ते म्हणाले, आता राष्ट्रवादीचे शहराचे आमदार जिल्हा विभाजनाची मागणी करीत आहेत. पूर्वी त्यांचे सरकार होते, त्यांच्या पक्षाचे पालकमंत्री आणि जिल्ह्यातीलच महसूलमंत्री होते, तेव्हा त्यांनी हा प्रश्न का मार्गी लावला नाही. जिल्हा विभाजन करण्यास माझा वैयक्तिक विरोधच आहे, असेही विखे पाटील म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- दुर्दैवी! चालक नजीरची ती ट्रिप ठरली अखेरची; हायड्रॉलीक पाईप तुटून डंपर अंगावरच उलटला
तर, आमदार जगताप यांनी नामांतराला आपला विरोध नाही. तो निर्णय स्थानिक पातळीवर व्हावा, मात्र त्यासोबतच जिल्ह्याचे विभाजन व्हावे. त्यामुळे नगर शहरासह दक्षिण भागाचा विकास होईल, असे मत जगताप यांनी मांडले आहे.