Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चिंतेत वाढ! राज्यातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या वाढली; ‘अशी’ आहे स्थिती!

7

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ८५७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६ हजार १०५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण २८६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात करोना बाधितांची संख्येत दिवसेंदिवस किंचित घट होत असताना कालच्या तुलनेत आज दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील आज कमी झाले आहे. या बरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या मात्र आज तुलनेने वाढली आहे. परिणामी राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार ८५७ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ६ हजार १०५ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण २८६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 6857 new cases in a day with 6105 patients recovered and 286 deaths today)

आजच्या २८६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ६४ हजार ८५६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५३ टक्के एवढे झाले आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत किंचित वाढ झाली आली असून ती ८२ हजार ५४५ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १५ हजार ७६८ इतका आहे. तर, ठाणे जिल्ह्यात ९ हजार ५८७ रुग्ण सक्रिय आहेत. तर, ठाण्याच्या खालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ८ हजार ७०८इतके रुग्ण आहेत. सांगलीत ही संख्या ८ हजार ८४४ इतकी आहे. साताऱ्यात ही संख्या ७ हजार ०८९ तर, मुंबई महापालिका हद्दीत सध्या ६ हजार ९२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अहमदनगरमध्ये ४ हजार ७०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, रायगडमध्ये २ हजार ०२२, रत्नागिरीत १ हजार ९९६, सिंधुदुर्गात १ हजार ९०१, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १ हजार ७४९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७३५ इतकी आहे.

यवतमाळमध्ये फक्त ६ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४९१, नांदेडमध्ये ही संख्या ४४० इतकी आहे. जळगावमध्ये ५४५, तसेच अमरावतीत ही संख्या ११० इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ६ वर आली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.