Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Dhananjay Munde car accident | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनजंय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. वाहनचालकाचा कारवरील ताबा सुटून परळीच्या आझाद चौकात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर धनंजय मुंडे यांच्या कारचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये कारच्या पुढच्या काही भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याचे दिसत आहे.
हायलाइट्स:
- धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात
- घरातून निघताना कार्यकर्त्यांचा गराडा
- धनंजय मुंडेंचा चेहरा आणि डोक्यालाही दुखापत
धनंजय मुंडे यांच्याकडून अपघातानंतर सोशल मीडियावरील एक पोस्ट वगळता फारशी माहिती देण्यात आलेली नाही. धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये केवळ आपल्या छातीला किरकोळ मार लागल्याचे म्हटले होते. मात्र, धनंजय मुंडे यांच्या गाडीची अवस्था पाहता हा अपघात अगदीच किरकोळ स्वरुपाचा नसल्याचे स्पष्ट होत आहे. सोशल मीडियावर धनंजय मुंडे यांच्या अपघातग्रस्त गाडीचे फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांची गाडी कव्हरने झाकून ठेवल्याचे दिसत आहे. हे कव्हर किंचित दूर करुन काढण्यात आलेल्या फोटोंमध्ये धनंजय मुंडे यांच्या कारच्या बोनेटचा चेंदामेंदा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या या अपघाताची राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे.
धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले?
मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामळे माझ्या गाडीचा लहानसा अपघात झाला आहे. यामध्ये माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी सध्या मला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये केले होते.
धनंजय मुंडे यांना आता मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे. गेल्याचवर्षी धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. तेव्हादेखील मुंडे काही दिवस रुग्णालयात होते. मात्र, त्यानंतर धनंजय मुंडे यांची प्रकृती व्यवस्थित होती. नुकत्याच झालेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही ते पूर्णकाळ उपस्थित होते. मात्र, कालच्या अपघातात त्यांच्या छातीला आणि डोक्याला मार बसला होता. त्यामुळे आता मुंबईतील डॉक्टर्स धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीविषयी काय माहिती देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्या परळीतील निवासस्थानी लातूरहून रुग्णवाहिका दाखल झाली होती. रुग्णवाहिकेतून लातूरला नेले जाणार असून त्यानंतर मुंडे मुंबईत दाखल होणार आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.