Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ओवेसी नमाज पठणासाठी कोपरगावच्या वस्तीवर थांबले, लोकांनी ओळखलंच नाही, नंतर ओळखलं तर….

5

Asaduddin Owaisi : बुधवारी औरंगाबादहून नाशिकच्या दिशेने जात असताना सायंकाळच्या नमाजची वेळ झाल्याने ओवैसी यांची गाडी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील एका छोट्याशा वस्तीवरील मस्जिद समोर थांबली. यावेळी त्यांच्या सोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील देखील होते. दोघेही अनपेक्षितपणे त्या मस्जिदमध्ये नमाज पठनासाठी पोहचले असता तेथे उपस्थित मुस्लिम समाजातील लोकांनी त्यांना ओळखलेच नाही.

 

MIM MP Asaduddin Owaisi offered Namaz at a chande kasare Kopargaon
असदुद्दीन ओवेसी (खासदार एमआयएम)

हायलाइट्स:

  • ओवेसी नमाज पठणासाठी कोपरगावच्या वस्तीवर थांबले,
  • पहिल्यांदा लोकांनी ओळखलंच नाही, नंतर हारतुरे घेऊन आले!
शिर्डी : औरंगाबादहून नाशिककडे निघालेले एमआयएमचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवेसी अचानक कोपरगाव तालुक्यातील एका वस्तीवरील मशिदीमध्ये मगरिबची नमाज पठणासाठी थांबले. पण तेथील लोकांनी असदुद्दीन ओवेसी यांना ओळखलंच नाही. ‘आपको कही देखा है’ म्हणत सुरुवातीला स्थानिकांनी त्यांना ओळखलं नाही मात्र हे ‘ओवेसी साहब’ असल्याचं समजल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एमआयएम पक्षाच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते उत्कृष्ट संसदपटू म्हणून देखील ओळखले जातात. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरील चर्चा सत्रांमध्ये सडेतोड भूमिका मांडणाऱ्या खा. ओवेसींनी एमआयएम या पक्षाचा देशभरात, विशेषतः मुस्लिम समाजात विस्तार करण्यात बऱ्याच अंशी यश मिळवलं आहे. पक्षाच्या कामानिमित्त ते देशभर दौरे करत असतात. बुधवारी औरंगाबादहून नाशिकच्या दिशेने जात असताना सायंकाळच्या नमाजची वेळ झाल्याने ओवेसी यांची गाडी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील एका छोट्याशा वस्तीवरील मशिदीसमोर थांबली. यावेळी त्यांच्या सोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील देखील होते. दोघेही अनपेक्षितपणे त्या मशिदीमध्ये नमाज पठनासाठी पोहचले असता तेथे उपस्थित मुस्लिम समाजातील लोकांनी त्यांना ओळखलेच नाही.

नमाज संपल्यावर सर्वजण कुतूहलाने दोघांकडे बघत असताना काही लोक त्यांच्या जवळ आले आणि ‘आपको कही देखा है’ म्हणत विचारपूस करू लागले. मात्र काहींना हे ‘ओवेसी साहब’ असल्याचे समजताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खासदार असदुद्दीन ओवेसी स्वतः आपल्या छोट्याशा वस्तीवरील मशिदीमध्ये आल्याने स्थानिक लोक भारावून गेले. लगेचच धावपळ करत शॉल आणली आणि खा. ओवेसी आणि खा. जलील यांचा सत्कार केला. तर त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.