Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जयरामा तायडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आलोक उपाध्याय याच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. उपाध्याय याने या गाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर हे अवमानकारक, अत्यंत आक्षेपार्ह भाषेत गाणे गायले आहे. या गाण्यात अनेक अश्लील शब्दांचा वापर करण्यात आल्याचे तायडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा आघाडी पुर्व महानगर अध्यक्ष जयरामा तायडे यांनी ही आलोक उपाध्याय यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा- भारती विशेष पोलीस आयुक्त, काँग्रेस खवळला,… अनिल परब यांना मोठा धक्का; वाचा टॉप १० न्यूज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अवमानकारक, तसेच अश्लील शब्द रचना असलेले गाण्याचा व्हिडिओ उपलोड केल्या बाबत अॅट्रोसिटी प्रिव्हेन्शन ऍक्टचे कलम ३(१) पी आणि ३ (१) क्यू प्रमाणे तसेच २९५ एक नुसार गुन्हे दाखल करण्याबाबत तक्रार केली आहे. ठाणेदार भानुप्रताप मडावी यांनी रितसर कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.
क्लिक करा आणि वाचा- जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ, गंभीर दाव्याने उडाली खळबळ
काय म्हटले आहे तक्रारीत?
या गाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली असून इतरही घाणेरडे संबोधन करण्यात आले आहे. यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड संताप आणि चीड आहे. देशात दंगल घडावी आणि जाती-जातींमध्ये दंगल घडावी असाच यामागे उद्धेश असावा असे तक्रारीत म्हटले आहे. हे लक्षात घेता आलोक उपाध्याय याच्याविरुद्ध अॅट्रोसिटी कायद्यानुसार तक्रार दाखल करुन त्यास अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सामाजिक स्वास्थ्य बिघडविणे आणि दंगली घडविण्याचा प्रयत्न करणे याबाबतही गुन्हे दाखल करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुंबईत लिफ्ट कोसळून मोठा अपघात, एकाचा मृत्यू, काही कामगार अडकले
गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्यांना या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, जर तक्रारीनुसार गुन्हे दाखल झाले नाहीत, तसेच कायदेशीर कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी युवा आघाडी च्या वतीने देण्यात आला. सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिध्दप्रमुख सचिन शिराळे, युवा आघाडी महानगर अध्यक्ष जय रामा तायडे, रितेश यादव, रणजीत तायडे, मंगेश सावंग, राजेश बोदडे , संतोष गवई, अवधुत खडसे, सचिन कांबळेसह आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.