Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजपकडून एकनाथ शिंदेंना ‘चेकमेट’? ‘मित्र’मधील नियुक्तीचा गृहखात्यातून वचपा काढल्याची चर्चा

15

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई पोलिस दलामध्ये विशेष आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या नियुक्तीमागे नक्की कोणते राजकारण झाले असावे, याचे अनेक तर्क करण्यात येत आहेत. भारती यांची नियुक्ती करून भाजपने आपली खेळी खेळतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी असलेल्या अजय आशर यांच्या ‘मित्र’वरील नियुक्तीवर मौन पाळल्याची किंमत वसूल केल्याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर येत्या महापालिका निवडणुकीची तयारी भाजप जोरात करीत असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात नियोजन मंडळाऐवजी नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘मित्र’ या संस्थेच्या उपाध्यक्षपदी शिंदे यांचे निकटवर्ती अजय आशर यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या. भाजपने त्यावेळी अतिशय सावध पवित्रा घेत मौन बाळगले. मात्र, आता अचानक भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विविध पक्षांचे संबंधित प्रभागातील काम, सामाजिक, राजकीय परिस्थिती, धर्म, जात, भाषा आदींमध्ये विभागलेल्या जनतेची मानसिकता आदी बाबी जितक्या महत्त्वाच्या असतात, तितकाच देशाची आर्थिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या या महानगरातील ६० टक्के जनता राहत असलेल्या झोपडपट्ट्या व छोट्या चाळी यांच्या अनुषंगाने फिरणाऱ्या राजकीय चक्राचाही मोठा भाग असतो. फडणवीस मुख्यमंत्री असताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत तत्कालीन ठाणे आयुक्त परमवीरसिंह यांच्यावर शिवसेनेने केलेल्या टीकेच्या दृक्‌श्राव्य फिती अजूनही समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून ते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत अनेकांनी ते निवडणुकीत भाजपला मदत करत असल्याचा जोरदार आरोप केला होता.

राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात शेकडो लोकांना विषबाधा; औरंगाबादमधील घटना

२०१७मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकाही भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष राज्यात युतीत असले तरी वेगळे लढले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सगळी शक्ती पणाला लावून शिवसेनेसमोर आव्हान उभे केले होते. या निवडणुकीच्या काळात देवेन भारती हे मुंबईत पोलिस सहआयुक्त पदावर होते. त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था विभाग होता. मुंबईतील सर्व पोलिस ठाणी त्यांच्या अधिकाराखाली येत होती. कोणत्या विभागात, कोणत्यावेळी चौकसभेला वा जाहीर सभेला परवानगी द्यायची, कुणाला नाकारायची, अनेक विभागांमधील ‘शक्तीशाली’ व्यक्तींचा कल कुठे असावा या सगळ्या गोष्टींवर पोलिसी अधिकारात अनेक प्रभाव टाकता येतात. फडणवीस यांनी शिवसेनेसमोर इतके तगडे आव्हान उभे केले की, निकालात अवघ्या दोन जागांनी भाजप मागे पडला. वास्तविक पाहता मुंबई महापालिका ताब्यात घेणे भाजपसाठी शक्य होते. मात्र महापालिका ही शिवसेनेसाठी संवदेनशील असल्याची बाब लक्षात घेत भाजपने तेव्हा शिवसेनेला सत्ता ताब्यात घेऊ दिली होती.

देवन भारती यांची विशेष पोलिस आयुक्त या पदावर नियुक्ती करताना सगळे पोलिस सहआयुक्त त्यांच्या अधिकार कक्षेत आणले आहेत. याचा मोठा परिणाम मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये होऊ शकतो, असे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.