Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ही तोडफोड का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, रेस्टॉरंट मालक मोनिष शशिकांत म्हेत्रे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “तुमची हिंदूंची हॉटेल चालवण्याची औकात आहे का”, अशा शब्दांत धमकी देत रेस्टॉरंटमधील खुर्च्यांवर कोयत्याने वार करत खुर्च्यांची तोडफोड केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी खुर्च्या हवेत भिरकावल्या आणि रेस्टॉरंटचं मोठं नुकसान करून तिथून निघून गेले. या घटनेनंतर रेस्टॉरंट मालक व त्यांच्या कुटुंबात भीतीचं वातावरण पसरलं आहे. रेस्टॉरंट मालक तक्रार देण्यासाठी सुद्धा घाबरत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन ६ तारखेला तक्रार दाखल करुन घेतली आहे.
Live सामन्यात क्रिकेटपटूला कशी काय आठवली पॉर्न स्टार; पाहा काय घडलं
मोनिष शशिकांत म्हेत्रे (वय ३९, रा. ३८८ भवानी पेठ फ्लॅट नं १०५ पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अजूनही फरार असून, तोडफोड आणि दहशत माजवणाऱ्या टोळक्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंट मालक म्हेत्रे हे ज्या इमारतीमध्ये राहतात त्याच इमारतीच्या तळमजल्यावर त्यांच्या मालकीचे निशा नावाचे रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट खूप जुने असून रेस्टॉरंटचा कारभार मोनिष व त्यांचा मोठा भाऊ शैलेश शशिकांत म्हेत्रे सांभाळतात. ५ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे मोनिष यांनी रेस्टॉरंट उघडले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रेस्टॉरंटमध्ये गर्दी कमी असल्याने कामगार संतोष आणि आझीम हे रेस्टॉरंटमध्ये काम करत होते.
मोनिष हे रेस्टॉरंटसमोर पार्किंगच्या ठिकाणी बसले होते. त्यावेळी दुचाकीवर पाच ते सहा मुल आले त्यांनी तोंडाला रुमाल व डोक्यात टोपी घातलेली होती. त्यांच्या हातात लोखंडी कोयते, हॉकी आणि रॉड असे हत्यार होते. ते रेस्टॉरंटमध्ये गेले त्यावेळी त्यांना मालक मोनिष हे दिसले नसल्याने आरोपी परत बाहेर आले आणि त्यांनी मोनिष यांना पार्किंगमध्ये पाहून त्यातील तिघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपी म्हणाले की, “तुमची हिंदुंची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? त्यानंतर त्यांनी रेस्टॉरंटची तोडफोड केली आणि तिथून निघून गेले. तोडफोड करणारे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकरणी पाच अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध आणि अधिक तपास लष्कर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दिलीप कांबळे करत आहेत.
शिक्षण क्षेत्रातील दुसरा मोठा घोटाळा उघड, पुण्यातील या CBSC शाळांचं बिंग फुटलं