Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास मर

9

कर्जत, दि.७ :-श्रीगोंदाता लुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी श्रीगोंदा सत्र न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.विशेष म्हणजे श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुजीब शेख यांनी एका वर्षातच हा निकाल दिला आहे. छबु उर्फ छबन पांडुरंग आखाडे (रा.चिंचोली काळदात) असे या गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे.

प्राजक्ता (बदललेले नाव) ही घरी एकटी असताना आरोपीने तिचे तोंड दाबत तिला घरात ओढत नेऊन ‘गप्प बस नाहीतर तोंड दाबून मारी’ अशी धमकी दिली होती.ती घाबरल्याचा फायदा घेत तिचे कपडे काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.त्यानंतर ‘याबाबत कुणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या आई बापाला ठार करेन’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर दुसरा आरोपी सुंदर उर्फ सुंदरदास उर्फ बबन आखाडे (रा.चिंचोली काळदात) याने फिर्यादीस घडलेल्या प्रकाराबाबत ‘आपण आपापसात मिटवून घेऊ अन्यथा तुम्ही जर तक्रार दिली तर आम्ही तुमच्यावर ॲट्रॉसिटीची खोटी तक्रार देऊ’ अशी धमकी दिली होती. याबाबत मुलीच्या आईचे फिर्यादीवरून दि.२ मार्च २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्जत पोलिसांकडून या स्पेशल केससाठी भा.दं वि. कलम ३७६,५०६ लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३,४,८,१२,१७ लावण्यात आले होते.याबाबत कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे पोलीस जवान महादेव कोहक यांनी पाठपुरावा केला आणि दि.६ जानेवारी रोजी न्यायालयाने निकाल घोषित केला. यामध्ये आरोपी छबु उर्फ छबन पांडुरंग आखाडे यास मरेपर्यंत भादवी ३७६ नुसार जन्मठेपेची शिक्षा, दहा हजार रुपये दंड, लहान मुलांचा लैंगिक अत्याचार कायद्यान्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. तर दुसरा आरोपी नामे सुंदर उर्फ सुंदरदास आखाडे याची संशयाच्या आधारे निर्दोष सुटका केली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे पोलीस जवान महादेव कोहक सुनील माळशखरे श्याम जाधव गोवर्धन कदम महिला पोलीस जवान आशा खामकर यांनी सदर कामे महत्त्वाची भूमिका बजावली. सरकारी वकील संगीता ढगे यांनी काम पाहून पाठपुरावा केला.

पोलीस निरीक्षकांच्या आवाहानंतर केली होती तक्रार!
कर्जत शहरातील सप्त्याच्या कार्यक्रमात बोलताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ‘कुणावर काही अन्याय झाला तर न घाबरता मला भेटा आपण न्याय मिळवून देऊ’ असे आवाहन केले होते आणि त्यानंतर आधार वाटल्याने पोलीस निरीक्षक यांना भेटून फिर्यादीने झालेल्या अन्यायाबाबत २ महिन्यानंतर तक्रार दिली आणि आज मा. सत्र न्यायालयाकडून न्याय मिळाला. फिर्यादी भावना व्यक्त करताना त्यांना भावना अनावर होऊन रडू आले. त्यामूळे फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांनी यादव यांचे आभार मानले.

“अल्पवयीन मुली महिला यांना कोणीही कोणत्याही प्रकारे त्रास देत असल्यास थेट संपर्क साधावा आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.”
– चंद्रशेखर यादव, पोलीस निरिक्षक, कर्जत पोलीस स्टेशन.

Leave A Reply

Your email address will not be published.