Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चोरीच्या दोन घटना, मात्र पॅटर्न एकच; प्रवाशांना लुटण्यासाठी वापरलेल्या पद्धतीने सगळेच चक्रावले

11

उस्मानाबाद : जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर जॅक टाकून वाहनधारकांना लुटणारी टोळी उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. यावेळी गंगाराम सुबराव पवार उर्फ गंज्या (वय १९ वर्ष) आणि बिभीषण नाना काळे (वय २३ वर्ष) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांनी चोरी केलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, लातूर येथील नामदेव भालेराव (वय ४७ वर्ष) हे २७ डिसेंबर रोजी दीड वाजता तडवळा शिवारातील रस्त्याने ओमनी वाहनाने (क्र. एम. एच. ४८ ए. ६८७१) प्रवास करत होते. दरम्यान त्यांच्या वाहनाखाली अचानकपणे काहीतरी वस्तू अडकल्याने ते पाहण्यासाठी खाली उतरले असता अंधारात दबा धरुन बसलेल्या चार अनोळखी इसमांनी भालेराव यांना धाक दाखवून त्‍यांच्याजवळील अंदाजे २ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल फोन हिसकावून नेला होता. तसंच जांभरुण, ता. मंठा, जि. जालना येथील अजय जाधव यांच्यासह अन्य सात लोक हे याच दिवशी ३ वाजताच्या सुमारास आळणी शिवारातील जवळे (दु.) फाटा येथील रस्त्याने अर्टिगा कार (क्र. एम. एच. २० सी. एच. ७५५०) ने प्रवास करत होते.

तरुणावर विश्वास ठेवून पुरती फसली तरुणी, विवाहानंतर पतीनेच इन्स्टाग्रामवर …

यावेळी रस्त्यावर असलेला जॅक सदर कारला अडकल्याने चालक अजय जाधव यांनी कार थांबवली असता चार अनोळखी व्यक्तींनी अचानकपणे कारजवळ येऊन कारमधील लोकांना दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच चाकूचा धाक दाखवून कारमधील लोकांजवळील २४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, तीन मोबाईल फोन आणि ५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ८२ हजार रुपयांचा माल लुटून पसार झाले होते. याप्रकरणी नामदेव भालेराव व अजय जाधव या दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपद्धतीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पारधी पिढी, ढोकी येथील गंगाराम सुबराव पवार उर्फ गंज्या आणि बीभीषण नाना काळे यांना पारधी पिढी शिवारातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान, आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोउपनि संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- विनोद जानराव, समाधान वाघमारे, फरहाण पठाण, नितीन जाधवर, अजित कवडे, दिनेश उंबरे, बबन जाधवर, महेबुब अरब, टेक्निकल ॲनालीसी‍स विंगचे अंमलदार- सुनिल मोरे, अशोक कदम यांच्या पथकाने केली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.