Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पोलीस भरतीसाठी एका उमेदवाराची ७ जानेवारी रोजी शनिवारी मैदानी चाचणी झाली होती. दुसऱ्या उमेदवाराची चाचणी रविवारी होणार होती. मात्र त्यांची मैदानी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. हे दोन जण पुणे आणि अहमदनगर येथून रायगडमध्ये पोलीस भरतीसाठी आले होते. वरसोली इथल्या कॉटेजमध्ये त्यांचं वास्तव्य होतं.
अलिबाग पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना नाईक आळी येथील एका कॉटेजमध्ये पोलीस भरती मैदानी चाचणीसाठी आलेल्या काही उमेदवारांकडे औषधी द्रव्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कॉटेजमध्ये तिघेजण राहत होते. त्यामधील दोन जण भरती प्रक्रीयेसाठी आले होते. त्यातील तिसरा त्यांच्यासोबत आला होता. पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली. यावेळी एक ग्रे रंगाचे चैनचे पाउच मिळून आले. त्यामध्ये दोन न्युरोकाइन्ड गोल्ड इंजेक्शन, असे नाव असलेल्या औषधी द्रव्यांनी भरलेल्या काचेच्या तीन बंद बॉटल, पाच ओमेगा व्हीआयटी सीई टॅबलेटस, तीन निप्रो कंपनीच्या सिरींज सुईसह, एक डिस्पोव्हॅन कंपनीची हायपोडर्मिक सिरींज, डिस्पोव्हॅन कंपनीच्या सहा पॅक बंद असलेल्या ४४ डीच्या नीडल्स, एक लाल रंगाची कॅप्सुल, डिस्पोव्हॅन कंपनीच्या दोन ३२ एनच्या नीडल्स, एक बीडी यू ४० इन्सुलिन, असे द्रव्य असलेली सिरींज नीडलसह त्यामध्ये औषधी द्रव्य भरलेले अशा प्रकारचे साहित्य सापडले आहे.
पोलिसांनी या औषधांबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. मैदानी चाचणीच्या आधी या गोळ्या, औषधे घेतल्यास त्याचा फायदा चाचणीत होत असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची चौकशी अलिबाग पोलीस करत आहेत. चौकशीमध्ये पुरावे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
औषधी द्रव्य व गोळ्यांचा वापर मैदानी चाचणीच्यापूर्वी केला जात असल्याचा संशय आहे. यामुळे सापडलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. या तिन्ही व्यक्तींचे जिल्हा सामान्य रूग्णालय, अलिबाग येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबई व नवी मुंबई येथे पाठवण्यात येत आहेत. तुर्तास तिन्ही व्यक्तींना सोडून देण्यात आले आहे. नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
ब्रेक फेल झाला पण चालकाचं प्रसंगावधान, ६४ शाळकरी चिमुरडे अपघातातून थोडक्यात वाचले
उमेदवारांनी शासनाने प्रतिबंधित केलेली कोणतीही वस्तू वा पदार्थ किंवा उत्तेजक द्रव्य सेवन करून भरती प्रक्रियेला सामोरे न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. जे उमेदवार असे गैरप्रकार करताना आढळून येतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
– सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड
उरणः मोठ्या विश्वासाने खोली भाड्याने दिली, महिनाभरानंतर भाडेकरुच्या घरात आढळला महिलेचा मृतदेह