Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिल्या शुभेच्छा
- बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचं केलं कौतुक
बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्कार समारंभानंतर राज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘बाबासाहेब हे फक्त शिवचरित्र सांगत नाहीत तर, २१व्या शतकात कसं जगायचं हे सांगतात. प्रत्येक वेळी ते नवं काहीतरी सांगत असतात. आपण कसं सावध आणि सतर्क असलं पाहिजे हे सांगतात. एखादी गोष्ट आज घडलेली असेल तर त्या घटनेशी मिळताजुळता ऐतिहासिक संदर्भ सांगतात. त्यातून आपल्याला नेमकं काय ते घ्यायचं असतं,’ असं राज यांनी सांगितलं.
वाचा: भाजपशी युतीबद्दल राज ठाकरेंनी प्रथमच मांडली जाहीर भूमिका
‘भाषेच्या बाबतीतही माझं अनेकदा त्यांच्याशी बोलणं झालं आहे. शिवकालीन मराठी कशी होती आणि ती कशी बदलत गेली हे बाबासाहेबांशी बोलण्यातून समजतं. ‘ळ आणि ल मधला फरक काय असतो, कैसी आणि कैची या शब्दांचा काय संबंध आहे हे समजतं. मराठीत आलेले अनेक शब्द फारसी आहेत. पण त्याबद्दल आपल्याला माहिती नसते. अनेक आडनावं कशावरून आली हे माहीत नसतं. मला त्यात रस असल्यानं मी त्यांच्याशी त्याबद्दल बोललोय. त्यातून शब्दांचा खजिना उलगडत गेला, असं राज म्हणाले.
वाचा: लॉकडाउनची आडकाठी महाराष्ट्रातच का? राज ठाकरे भडकले!
राज ठाकरे यांनी यावेळी ‘फडणवीस’ या नावाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘फडणवीस हे मुळात आडनाव नाही. ते मूळचा पर्शियन शब्द आहे. ‘फर्द नलीस’. ‘फर्द’ म्हणजे कागद, ‘नलीस’ म्हणजे लिहिणारा. त्यावरून फर्द नलीस. नंतर फडावर बसून लिहिणं आलं. त्यातून पुढं फडणवीस हे असं झालं आणि पुढं व्यक्तीच्या नावाला चिकटलं,’ असं राज यांनी सांगितलं.
‘बाबासाहेबांवर टीका करणाऱ्यांचे हेतू वेगळे’
बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर काही वर्षांपूर्वी टीका झाली होती. त्याबाबतही राज यांनी आपलं मत मांडलं. ‘जातीच्या नावावर ज्यांना मतदान हवं असतं, ते ऐकीव गोष्टीवर चालतात आणि टीका करतात. अशा लोकांना उत्तर देणं बरोबर नाही, त्यांचा हेतू वेगळा असतो,’ असं राज म्हणाले.
वाचा: अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का? फडणवीस म्हणाले…