Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोयता गँगला पुणे शहर पोलीस आयुक्तांचा दणका, हडपस

5

पुणे,दि.१२:- पुणे शहरात काही दिवसांपूर्वी कोयता टोळीची दहशत चांगलीच वाढली होती व या दहशतीमुळे पुण्यातील नागरिकांची झोप उडाली होती व पुणे शहर पोलीस आयुक्त यांनी आता गुन्हेगारांची कोंबिंग ऑपरेशन सुरू केली आहे व  हडपसर परिसरातील समिर लियाकत पठाण आणि त्याच्या साथीदारांनी नागरीकांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.ही घटना मांजरी बुद्रुक येथील गोपाळपट्टी चौकात ९ डिसेंबर २०२२ रोजी घडली होती. त्यावेळी आरोपींनी गाडीवरुन जाताना कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 13 जणांवर गुन्हा दाखल करुन 10 जणांना अटक केली आहे. समिर पठाण आणि त्याच्या टोळीवर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.टोळी प्रमुख समिर लियाकत पठाण (वय-२६ रा. विशाल कॉलनी, मांजरी), शोएब लियाकत पठाण (वय-२०रा. वैशाली हाईट्स, मांजरी), गणेश उर्फ दादा विठ्ठल हवालदार (वय-२२ महादेवनगर, मांजरी), प्रतिक उर्फ एस.के. हनुमंत कांबळे (वय-२० रा. गोपाळपट्टी, मांजरी), गितेश दशरथ सोलनकर (वय-२१ रा. मांजरी रोड, हडपसर), ऋतिक संतोष जाधव (वय-१९ रा. महादेव नगर, मांजरी), साई राजेंद्र कांबळे (वय-२० गोपाळपट्टी, मांजरी), ऋषिकेश उर्फ सोन्या संजय पखाले (वय-२४ रा. साडे सतरानळी, मांजरी), ऋतिक सुनील मांढरे (वय-२२ रा. मांजरी रोड, हडपसर), प्रतिक शिवकुमार सलगर (वय-१९ रा. मांजरी) यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर इतर तीन साथीदार फरार आहेत. आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी प्रमुख समिर पठाण आणि त्याचा साथीदार शोएब पठाण, गणेश उर्फ दादा हवालदार यांच्यावर पुणे शहरात वेग-वेगळ्या पोलीस ठाण्यात दरोडा, मारामारी, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ विक्रांत देशमुख यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा यांना सादर केला होता. या
प्रकरणाची छाननी करुन टोळीविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं. १५५४ / २०२२ भा.द.पि. कलम ३०७, ३२४,५०४, ५०६, १४३, १४५, १४७, १४९, महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) (३)१३५, भारतीय हत्यार का. ४ (२५) क्रिमीनल अॅम क.३ व ७ दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii)३ (२) व ३(४) या अंतर्भाव करण्याची मा अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजन शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, रंजन शर्मा, विक्रांत देशमुख, पोलीस
उप-आयुक्त, परि-५, पुणे बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गर्शनाखाली अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, दिगंबर शिंदे पोलीस निरीक्षक (गुन्हे). विश्वास डगळे पोलीस निरीक्षक (गुन्हे). तपास पथकाचे सहा. पोलीस
निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश शिंदे, पोलीस अमलदार, पांडुळे, शाहीद शेख
दुधाळ सोनवणे व्हॅलन्स विभागाचे पोलीस अंमलदार, प्रविण शिंदे, गिरीष एकोंगे यांनी केली आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर, रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.