Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

“लव्ह जिहाद रोखण्यासाठी जिजाऊंचे संस्कार महत्वाचे” – हभप आकाश भोंडवे पाटील महाराज

18

पुणे,दि.१४ :- पुण्यातील पाषाण परिसरातील राजे शिवराय प्रतिष्ठान तर्फे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त (पेठ जिजापुर) पाषाण मध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

प्रमुख वक्ते म्हणून हभप. आकाश भोंडवे पाटील यांचे मार्गदर्शन झाले .या प्रसंगी
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरूण(आप्पा ) बबनराव निम्हण , प्रमुख उपस्तिथी राहुलभाऊ रामदास मुरकुटे (पाटील) गणेशभाऊ कदम व प्रतिष्ठानचे संस्थापक महेशभाऊ पवळे उपस्थित होते .
मार्गदर्शन करताना आकाश भोंडवे(पाटील) यांनी कुटूंबा मध्ये महिलांनी आपल्या पुढच्या पिढीला आपल्या संस्कृती , धर्म आचरणा वरती होत असलेल्या अतिक्रमणा विषयी जागृत केले. महिलांनी सजग राहून खोट्या प्रेम प्रकरणातून लव्ह जिहाद च्या माध्यमातून महिलांवर अत्याचार होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे .
या प्रसंगी महेशभाऊ पवळे , राहुलभाऊ मुरकुटे पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना आशा कार्यक्रमाची सामाजिक गरज असल्याचे सांगितले .
या निमित्ताने सौ स्वाती शरदभाऊ मोहोळ यांना स्वारद फाऊंडेशनच्या माध्यमातुन करीत असलेल्या हिंदुत्वाच्या कार्याबद्दल “राजमाता जिजाऊ” पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाला पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी, सुसगाव, म्हाळुंगे , औंध येथील ग्रामस्थ व तरुण वर्ग ,महिला उपस्थित होत्या .
कार्यक्रमाचे आयोजन राजे शिवराय प्रतिष्ठान आणि समस्त पाषाण सोमेश्वरवाडी सुतारवाडी शिवभक्त व ग्रामस्थांनी केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.