Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आम्ही समाजाचे देणे लागतो! डीवाय पाटील यांच्या पुत्रांनी आईच्या वाढदिवसाला वाटली तीन कोटींची शिष्यवृत्ती
आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आईच्या संस्काराची शिदोरी उपयुक्त ठरल्याची आणि आपल्या कर्तृत्वात तिचाच सिंहाचा वाटा असल्याची जाण ठेवत तिच्या कष्टाची उतराई म्हणून तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तब्बल तीन कोटींची शिष्यवृत्ती हुशार मुलांना वाटण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. मुलांचा हा उपक्रम केवळ कौतुकास्पद नव्हे तर आदर्शवतही ठरणार आहे. डॉ. डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, पुणे येथील डॉ. डी .वाय पाटील विद्यापीठाच्या प्रकुलपती डॉ. भाग्यश्री पाटील आणि आमदार सतेज पाटील यांचे यांनी हा उपक्रम राबविला.
माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांच्या पत्नी शांतादेवी पाटील मंगळवारी वाढदिवस होता. या निमित्ताने डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थेमध्ये प्रथम वर्षासाठी सर्वोच्च गुणांनी प्रवेश घेतलेल्या ६६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले. डॉ. संजय डी. पाटील यांच्या संकल्पनेतून हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सौ.शांतादेवी डी.पाटील, मुले डॉ.संजय डी. पाटील, भाग्यश्री पाटील, डॉ.डी. वाय. पाटील एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन पुणेच्या उपाध्यक्ष सुप्रिया पी. चव्हाण-पाटील, डॉ. डी. वाय. पाटील अकॅडमी शांतीनिकेतनच्या संचालिका राजश्री काकडे आणि आमदार सतेज डी.पाटील उपस्थित होते.
क्लिक करा आणि वाचा- तांबे, पटोले आणि देशमुखांचे पत्र, काँग्रेसमध्ये घडतंय तरी काय?, महिलांसाठी LIC ची भन्नाट पॉलिसी; वाचा टॉप १० न्यूज
या पाचही भावंडांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी. ज्या त्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने आपआपला स्वतंत्र असा ठसा उमटविलेला. कार्यकर्तबगारीतून सगळ्यांची स्वतंत्र व्यक्तिमत्वे घडली. पण आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील हुशार मुलांना शिष्यवृत्ती देत आपण समाजाचे काही तरी देणे लागतो याचा पुरावाच दिला.
डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, “गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप योजना सुरू केले. आमच्या जीवनाला आकार देणाऱ्या आई सौ.शांतादेवी डी. पाटील यांच्या जन्मदिनी त्यांच्याच उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करताना विशेष आनंद होत आहे. पुढील वर्षापासून प्रथम वर्षाला सर्वोत्तम ठरणारा विद्यार्थी त्यासाठी पात्र ठरेल.
क्लिक करा आणि वाचा- पेट्रोलपंपाच्या बाजूला आयशर गाडी उभी होती, भल्या पहाटे आतील दृश्य पाहून लोकांची घाबरगुंडी उडाली
आमदार सतेज पाटील म्हणाले, ” आयुष्याच्या आतापर्यंतच्या यशामध्ये आईचा सिंहाचा वाटा आहे. दादांचे आशीर्वाद आईची प्रेरणा त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळाली. अपयशाने नाउमेद व्हायचे नाही आणि आनंदाने हुरळून जायचं नाही ही आई-वडिलांची शिकवण कायम मनात कोरली गेली. यामुळेच जमिनीशी नातं कधी आमचं तुटलं नाही.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती, उद्याच होती परीक्षा, विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
स्कॉलरशिप कमिटीचे अध्यक्ष व आमदार ऋतुराज पाटील, उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, सदस्य कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, डॉ. के प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, अधिष्ठाता डॉ.आर.के. शर्मा व सचिव पी.डी.उके यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून शांतादेवी डी. पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.